डोंबिवली: मध्य रेल्वेच्याकल्याण यार्डमध्ये मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय लोकल गाड्यांची वाहतूक विभक्त करण्यासाठी कल्याण गुड्स यार्ड येथे ४ नवीन कोचिंग प्लॅटफॉर्म बांधणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे. अर्धवर्क, छोटे पूल आणि विविध नागरी कामांसाठी कंत्राट देण्यात आले असून त्या कामांची मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवानी आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी कल्याण यार्ड रीमॉडेलिंगच्या कामाची गुरूवारी पाहणी केली.
गुड्स लाईनसाठी पहिल्या टप्प्यातील बांधकामामध्ये गटार आणि सीमाभिंतीचे काम, मातीचे काम प्रगतीपथावर आहे. सुमारे पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहे. सेवा इमारती आणि क्वार्टरचे पुनर्वसनसाठी कंत्राट देण्यात आले आहे. प्रस्तावित ट्रॅकच्या अलाइनमेंटमध्ये येणाऱ्या सेवा इमारतीचे बांधकाम सुरू आहे. १० सेवा इमारतींपैकी ८ इमारतींचे काम प्रगतीपथावर असून, यामध्ये ८ इमारतींच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. ललवानी यांनी लांबपल्ल्याच्या आणि उपनगरीय गाड्या वेगळे करणे आणि कल्याण यार्डातील गुड्स यार्डच्या एकत्रीकरणासाठी कल्याण यार्डची पाहणी केली. ट्रॅकशी संबंधित कामांचे कंत्राट देण्यात आले आहे. तोडण्याचे काम प्रगतीपथावर आहे आणि बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. कल्याण एसी इलेक्ट्रिक लोको शेडचीही पाहणी केली.