कल्याण-अवैधपणे खडीची वाहतू करणारे दोन डंपर कल्याण तहसील कार्यालयाने जप्त केले होते. जप्त करण्यात आलेले दोन्ही डंपर कल्याण प्रांत कार्यालयाच्या आवारात उभे करुन ठेवले होते. हे डंपर चोरी करुन नेल्याची धक्कादायक घटना काल घडली. पोलिसांनी डंपर चोरी करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे अजरुन महतो आणि सुरेश् महतो अशी आहे. हे दोघेही मूळचे झारखंड राज्यात राहणारे आहेत.
कल्याणच्या पश्चिम भागातील वायलेनगर परिसरात कल्याणच्या तहसील कार्यालयातील तलाठ्यांनी काही दिवसापूर्वी अवैधरित्या खडीचा डंपर नेत असलेल्या दोन डंपरच्या विरोधात कारवाई केली होती. जप्त करण्यात आलेले दोन्ही डंपर कारवाई पथकाने प्रांत कार्यालयाच्या आवारात उभे करुन ठेवले. तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयाच्या लक्षात आले की, जप्त केलेले डंपर आवारात नाहीत. ते कोणी तरी चोरी करुन नेले आहे. हे समजताच त्यांना मोठा धक्काच बसला. या प्रकरणी त्यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांनी डंपर चोरी करणा:यांना बेडया ठोकल्या. तसचे चोरीस गेलेले डंपरही जप्त करुन पोलिस स्टेशनजवळ उभे करुन ठेवले आहेत. अवैधरित्या खडीची वाहतूक करणारा तो माफीया कोण आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.