शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

Kalyan: आम्ही सत्तेसाठी भुकेले नाही, कारण....,  मनसेचे आमदार राजू पाटील यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 7:24 PM

MNS MLA Raju Patil News: "मला तुम्हाला सत्तेत बसवायचे आहे" हे विधान राज ठाकरे यांनी केले असले तरी आम्ही सत्तेसाठी भुकेले नाही. सत्तेसाठी कोणाच्या तरी मागे जाणाऱ्यातील आम्ही नसून लोकांची कामं करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे अशा शब्दांत मनसे नेते आमदार राजू पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली.

- मयुरी चव्हाण काकडे कल्याण  - राजकरणात एक सत्य आहे की तुम्ही जर सत्तेमध्ये नसाल तर आमदार होऊन काही फायदा नाही. म्हणून "मला तुम्हाला सत्तेत बसवायचे आहे" हे विधान राज ठाकरे यांनी केले असले तरी आम्ही सत्तेसाठी भुकेले नाही. सत्तेसाठी कोणाच्या तरी मागे जाणाऱ्यातील आम्ही नसून लोकांची कामं करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे अशा शब्दांत मनसे नेते आमदार राजू पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली.

कल्याण - शीळ मार्गावरील वाहतूक कोंडी आणि पाणी हे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठे दोन प्रश्न आहेत. कल्याण शीळ रोडचे काम एमएसआरडीसी करत आहे, मेट्रोचे काम एमएमआरडीए करत आहे. जर मेट्रोचे काम सुरू होणार होते तर 30-40 कोटीचा चुराडा करून डिव्हायडर आणि लाईटचे पोल का उभे केले? हा पैसा कोणाच्या बापाचा आहे का ? पाण्यात बुडणाऱ्या स्मार्ट सिटी पार्कसाठी 100 कोटी रुपये खर्च करण्याऐवजी इथल्या तळ्यांच्या संवर्धनासाठी हा निधी खर्च का केला नाही ? असे संतप्त सवाल उपस्थित करत त्यांनी नियोजनाच्या अभावामुळे घाईघाईत कामे केली असल्याची घणाघाती टिका आमदार पाटील यांनी केली. तसेच त्यांच्याकडे दूरदृष्टी नसून आम्ही पुढे टिकू की नाही टिकू, येऊ की नाही या भितीपोटी ओरबाडून घेऊन जाण्याची वृत्तीतून हे घडत असल्याचा गंभीर आरोपही आमदार पाटील यांनी केला. 

कल्याण डोंबिवलीतील प्रमूख पत्रकारांची संघटना असलेल्या निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुक, मनसेची भूमिका, मराठा आरक्षण, शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुती, मतदारसंघातील विकासकामे आदी विषयांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांना दिलखुलास तसेच परखडपणे उत्तरं दिली.

 मराठी माणूस टिकवण्यासह मुंबईची वाट लावण्यासही तत्कालीन शिवसेना जबाबदार...शिवसेना सत्तेत येण्यापूर्वीची मुंबई आणि नंतरची मुंबई यामध्ये मोठा फरक आहे. पूर्वीची मुंबई सुटसुटीत होती. सत्ताधारी शिवसेनेनं 40 लाख मोफत घरांची योजना आणली. या योजनेचा उद्देश खूप चांगला होता. परंतु त्यावेळेस ही मानसिकता बनली की मुंबईत जा, फुटपाथवर एक झोपडी बांधा मग तुम्हाला मोफत घर मिळेल. या चुकीच्या धोरणामुळे हा सर्व बट्ट्याबोळ झाला असून त्याला मुंबई महापालिकेतील शिवसेनेचाही त्याला हातभार लावला. ज्याप्रमाणे त्यावेळी मुंबईतील मराठी माणूस त्यावेळी शिवसेनेमुळे टिकला तशी या मुंबईची वाट लावण्यासही शिवसेनाचा जबाबदार असल्याचे परखड मत आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले. 

 विधानसभा निवडणुकीत त्यांनी चांगुलपणा दाखवला तर स्वागतच आहे...लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कल्याण लोकसभा मतदारसंघात आम्ही प्रामाणिकपणे डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयासाठी काम केले आहे. त्याअनुषंगाने आगामी विधानसभा निवडणुकीत ते आपल्याला मदत करतील की नाही याबाबत आपण सांगू शकत नाही. परंतू एक गोष्ट नक्की आहे की ते आपल्यासमोर उभे राहिले आणि आपल्याला लोकांनी निवडून दिले तर मग त्यांची डबल नाचक्की होईल. त्यांचे राजकरण कसे चालते यावर नाही तर आम्ही आमच्या भरवशावर निवडणुका लढणार असून त्यांनी चांगुलपणा दाखवला तर त्यांचे स्वागतच आहे अशा शब्दांत आमदार पाटील यांनी यावेळी उत्तर दिले.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाkalyan-rural-acकल्याण ग्रामीण