शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

ह्याला म्हणतात गरुडझेप... जगातल्या धनाढ्य उद्योगपतीसाठी कल्याणची मराठमोळी लेक बनवणार स्पेस रॉकेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 6:11 AM

'न्यू शेफर्ड'च्या टीममध्ये समावेश.

ठळक मुद्दे'न्यू शेफर्ड'च्या टीममध्ये समावेश

कल्याण : जगप्रसिद्ध ब्रँड ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची ब्लू ओरिजीन ही अमेरिकन स्पेस कंपनी अंतराळ सफरीचा नवा इतिहास घडविणार आहे. २० जुलैला काही निवडक पर्यटकांना घेऊन ही कंपनी आकाशात झेपावणार आहे. या पर्यटकांमध्ये कल्याणची संजल गावंडे आहे.

कोळसेवाडीत राहाणा-या संजलची आई सुरेखा एमटीएनएलमध्ये कामाला आहे, तर वडील अशोक गावंडे हे केडीएमसीचे निवृत्त कर्मचारी आहेत. संजलने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिने शिक्षणाच्या जोरावर अमेरिकेतील मिशिगन टेक विद्यापीठात प्रवेश मिळविला. तेथे तिने मास्टर्स पदवी मिळवली आहे. मरक्युरी मरीन कंपनीत तिला मनासारखी नोकरी मिळाल्याने तिचे लक्ष अवकाशाकडे लागले आहे.

नोकरी करीत असताने तिने विमान चालविण्याचे प्रशिक्षण घेतले.  त्यानंतर ती टोयटा रेसिंग डेव्हलपमेंट कंपनीत कामाला लागली. तिने नासामध्येही अर्ज केला होता. तेथे तिची निवड झाली नाही. मात्र, ब्लू ओरिजीन कंपनीत तिची निवड झाली. अंतराळ तंत्रज्ञानात न्यू शेफर्डचे लॉचिंग हा एक मैलाचा दगड समजला जातो. हे रॉकेट डिझाईन करणाऱ्या १० जणांत संजल आहे.

काय आहे न्यू शेफर्ड?आतापर्यंत अंतराळात केवळ उपग्रह किंवा त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी यान सोडले जायचे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत स्पेस टुरिझम अर्थातच अंतराळ सफर नावाची नवीन संकल्पना अस्तित्वात आली आहे. त्यासाठी ब्ल्यू ओरिजीन कंपनी काम करत असून, अंतराळ पर्यटकांसाठी त्यांचे न्यू शेफर्ड यान २० जुलैला अंतराळात झेपावणार आहे. यात अमेझॉन संस्थापक जेफ बेझोससह त्यांचा भाऊ आणि काही पर्यटक असणार आहेत. विशेष म्हणजे या यानातून प्रवास करण्यासाठीची किंमत तब्बल २८ मिलियन डॉलर (सुमारे २०८ कोटी ७८ लाख ३४ हजार रुपये) इतकी आहे.

हे यान अवकाशात आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त अंतराळ सीमेपर्यंतचा अवघ्या ११ मिनिटांचा प्रवास करून पुन्हा पृथ्वीवर उतर. त्यामुळेच न्यू शेफर्डच्या लाँचिंगचा आंतरराष्ट्रीय अंतराळ क्षेत्रासह जागतिक पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने जगाच्या इतिहासात एक नवा अध्याय रचला जाणार आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीInternationalआंतरराष्ट्रीयkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMTNLएमटीएनएल