कल्याण - कल्याण शीळ रोड हा विशेषतः बार मूळे प्रसिद्ध आहे. सध्या येथील काही बारमालकांचे धाबे दणाणलेत. कारण या बारमालकांनी वाढीव बांधकाम केलं होतं. कल्याण-शीळ रस्त्यालगत जवळपास ४२ बार आहेत. मानपाडा पोलिसांनी तयार केलेल्या अहवालानुसार, १७ बारमालकांनी वाढीव बांधकाम केलं.हा अहवाल मानपाडा पोलीस ठाण्याकडून केडीएमसीला पाठवण्यात आला होंता. त्यानुसार केडीएमसीला हाताशी धरत ही करण्यात आली. ही बाब काहीशी दिलासादायक असली तरी, मागच्या काही दिवसांचा आढावा घेतला तर कल्याण क्राईम ब्रांचने ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली अश्लील चाळे सुरू असलेल्या बार वर धाडसात्र टाकत कारवाई केली.त्यामुळे अशा बारचा अहवाल मानपाडा पोलीस कधी थेट कारवाई करतात का हे पाहणं गरजेचे आहे.
कृष्णसाई, किंग, रसीला, टुरिस्ट या बारच्या वाढीव बांधकामांवर कारवाई करण्यात आली. केडीएमसीचे सहायक आयुक्त भारत पवार यांनी कारवाई केली, तर उर्वरित बेकायदा बांधकाम केलेले बार हे मनपाच्या अन्य प्रभागाच्या हद्दीत येतात. तेथील सहायक आयुक्त ते तोडण्याची कारवाई करतील, असेही पवार यांनी सांगितले. बेकायदा बांधकाम कारवाईदरम्यान पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तसेच जेसीबी, पोकलेनद्वारे ही कारवाई करण्यात आली. हॉटेल बार यांच्या बाहेर मोकळ्या जागेत अनेकदा शेड बनवण्यात येतात. मात्र कारवाई केल्यानंतर पुन्हा या शेड उभारल्या जातात हे अनेकदा समोर आलंय. त्यामुळे आता या कारवाईचा किती आणि कसा परिणाम होतो, ते पाहावं लागेल?