कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणूकीत महाविकास आघाडी होणार. भाजप आणि मनसेला शह देण्यासाठी आम्ही चांगली एकता तयार करुन अशी प्रतिक्रिया कल्याण डोंबिवली नवनियुक्त राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी दिली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकामध्ये सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादीचे दोनच नगरसेवक होते. पक्षाला तारण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी आमदार शिंदे यांना जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपविली. आज जगन्नाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या घरी मोठय़ा संख्येने जमा झाले. यावेळी शिंदे सांगितले की, सर्व पद्धतीने पक्षाची बांधणी करायची आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत रखडलेली विकास कामांना चालना देण्याचा माझा पहिला प्रयत्न आहे. यामध्ये स्वच्छता, रस्ते, पाणी आरोग्य या महत्वाच्या बाबींवर मी जास्त लक्ष देणार आहे. येणारी दुस:या कोरोनाच्या फेजमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावरुन नागरीकांना जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहेत.
महाआघाडीचे सरकार आहे. शिवसेना काँग्रेस आाणि राष्टवरादीची आघाडी आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक सुद्धा महाविकास आघाडी लढविणार आहे. त्यात राष्ट्रवादीचे 14 नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जाईल. सगळ्य़ांना समान न्याय देताना पुन्हा एकदा महापौर आघाडीचा कसा येईल याकडे माङो लक्ष्य आहे.निवडणूकीसाठी भाजप व मनसेने दंड थोपटले आहे. त्यादृष्टीने महाविकास आघाडीही सुद्धा त्यांना शह देण्याचा प्रयत्न करणार. महापालिकेवर महाविकास आघाडीचा ङोंडा फडकवू असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.