- मुरलीधऱ भवार
कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर विविध नागरी समस्या सोडविण्याच्या मागणकरीता जागरुक नागरीक फाऊंडेशनच्या वतीने ५ डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. आयुक्तांच्या भेटीसाठी निघालेल्या आंदोलनकर्त्यांना सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वारावर अडविल्याने आंदोलनकर्त्यांनी प्रवेशद्वारच ठिय्या आंदोलन सुरु केले. अध्या तासानंतर आयुक्त कार्यालयाकडून भेटीचा निरोप आला. या आंदोलनास राष्ट्रवादीचे माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी जाहिर पाठिंबा देत सक्रीय सहभाग घेतला. मनसेनेही या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
५ डिसेंबरपासून सुरु असलेल्या धरणे आंदोलन मागे घेण्याची विनंती अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी केली होती. मात्र धोरणात्मक विषयावर जोर्पयत ठोस आश्वासन दिले जात नाही. तोर्पयत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. असे आंदोलनाचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांनी जाहिर केले होते.
आज आंदोलनकर्ते घाणेकर यांच्यासह संजिता नायर, वंदना सोनवणे, चेतना रामचंद्रन, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उमेश बोरगांवकर, संदीप देसाई, मनसेचे रुपेश भोईर, महेंद्र कुंदे यांनी भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांची प्रवेशद्वारावर अडवणूक केली गेली. आंदोलनकत्र्यानी प्रवेशद्वारावर ठिय्या दिला. जोर्पयत भेट दिली जात नाही. तोर्पयत ठिय्या सुरुच ठेवण्याचे जाहिर केले. या आंदोलनास माजी आमदार शिंदे यांनी पाठिंबा दिला. आयुक्त या शहराचे पालक आहे. त्यांनी आंदोलनकत्र्यांना भेट दिलीच पाहिजे. या निर्ढावलेल्या प्रशासनाचा राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करतो असे शिंदे यांनी सांगितले.
शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. रुग्णालयात सोयी सुविधा नाहीत. घनकच:याचा प्रश्न आहे. त्याचबरोबर नागरीकांच्या माथी लादलेल्या मालमत्ता कराचा बोझा आहे. या विविध प्रश्नावर प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन हे प्रश्न सोडविले पाहिजेत असे माजी आमदार शिंदे यांनी यावेळी सांगितले. अध्या तासाच्या ठिय्या आंदोलनानंतर आयुक्तांनी भेट देण्याची तयारी दर्शविली. आत्ता आंदोलन कत्र्यासोबत आयुक्तांची चर्चा होऊन त्यातून काय तो तोडगा निघू शकतो.