मुरलीधर भवार, कल्याण :डोंबिवली नांदिवली परिसरातील रेरा प्रकरणातील बेकायदा इमारतीवर महापालिकेने हातोडा चालविला आहे. महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या आदेशानुसार ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी ही कारवाई केली आहे.
नांदिवली येथील तळ अधिक सात मजली असलेल्या बेकायदा इमारतीच्या दोन विंग होत्या. प्रथम गॅस कटरच्या सहाय्यान स्ल’ब कट करण्यात आले. त्यानंतर हाय जॉ क्रशरच्या सहाय्याने इमारतीचे पाडकाम करण्यात आले. ही कारवाई १७ फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आली होती. या कारवाईस चार वेळा विरोध झाला.
चार वेळा ही कारवाई बंद पाडण्यात आली होती. कारवाईस झालेला विरेधत सहाय्यक आयुक्त पवार यांनी मोडित काढून कारवाई सुरु ठेवली. या बेकायदा इमारतीच्या शेजारीच निमूळती गल्ली आणि कौलारु छत असलेल्या चाळीतील घरे होती. या चाळीतील घरे कारवाई दरम्यान रिक्त करण्यात आली होती. कारवाईसाठी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. कारवाईमुळे धुराळा उडाला होता. ही धूळ बसविण्याकरीता पाण्याच्या ट’ंकरने फवारा मारण्यात आला.
महापालिका हद्दीतील ६५ बिल्डरांनी महापालिकेकडून वांधकाम परवानगी मिळालेली नसताना बनावट सही शिक्के आणि परवानगीच्या आधारे रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविले हाेते. या प्रकरणाचा पर्दाफाश वास्तूविशारद संदीप पाटील यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्राीनुसार ६५ बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. ही याचिका न्यायप्रविष्ट आहे. या रेरा, महापालिका आणि राज्य सरकारची फसवणूक करण्यात आलेल्या ६५ बेकायदा बांधकाम प्रकरणातील नांदिवली येथील ही इमारत होती.