कल्याण-मुख्यंत्र्यांनी राज्यभरातील बेकायदा बार, हुक्का पार्लर यांच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले आहे. त्यांच्या आदेशापश्चात आज मिरा भाईंदर, ठाणे पाठोपाठ आज कल्याण पूर्वेतील अनधिकृत सत्यम बारवर महापालिकेने पोलिस बंदोबस्त हातोडा चालविला आहे.त्याचबरोबर कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरातील बेकायदा टपऱ्या, दुकाने यांच्यावर जेसीबी चालवित जमीनदोस्त करण्याची कारवाई केली आहे.कल्याण पूर्वेतील सत्यम बारच्या विरोधात सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी महापालिका अधिकारी यांच्या पुढाकारने कारवाई केली आहे. बेकायदा बारवर कारवाई सुरु झाल्याने बेकायदा बार चालकांचे धाबे दणाणले आहेत.आज सकाळी कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरातील टपऱ्या दुकाने यांच्यावरही महापालिकेने जेसीबी चालवित जमीनदोस्त करण्याची कारवाई केली. यावेळी एका दुकान चालकाने त्याला विरोध केला. त्याने हातात दगड घेत स्वत:च्या डोक्यात मारुन घेतल्याने तो जखमी झाला. मुख्यमंत्री शिंदे यांनी आदेश दिले असताना शिंदे गटाच्या महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे यांनी बिर्ला का’लेज परिसरातील टपऱ्या आणि दुकानाच्या विरोधातील कारवाईस विरोध केला. कारवाई करण्यात आलेील दुकाने ही ३० वर्षे जुनी आहेत. या दुकानातून अंमली पदार्थ विकले जातना ही. त्याठिकाणी चहा, वह्या पेन विकले जातात. या दुकानदारांना महापालिकेने परवाना द्यावा. त्यांचे स्मार्ट स्टा’लचा दर्जा द्यावा अशी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.कल्याणमध्ये एका हुक्का पार्लरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा हुक्का पार्लर कल्याण पश्चिमेतील ब प्रभाग कार्यक्षेत्रातील आहे. संबंधित पोलिस अधिकारी, महापालिका आधिकारी, उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी यांच्याकडे त्वरीत माहिती घेऊन कारवाईचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिली आहे.केडीएमसीत पार पडली बैठक महापालिका आयुक्त जाखड यांनी अनधिकृत बार, ढाबे, गुटखा पार्लर यांच्यावर नि:पक्षपातीपणे धडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त जाखड यांनी दिली आहे. या विषयावर आयुक्तांच्या दालनात पाेलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे, सुनिल कुराडे, महापालिकेतील सर्व विभागीय आयुक्तांसह सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.महापालिाक हद्दीतील अनधिकृत बार, गुटखा पार्लर, ढाबे, टपऱ्या व इतर ज्या ठिकाणी अल्पवयीन मुलांना मद्य विक्री केली जाते. त्यांना यापूर्वीच सहाय्यक आयुक्तांनी नोटीसा बजाविल्या आहेत. पुढील कार्यवाही आता सुरु करण्यांत आली आहे. ज्या अनधिकृत बारच्या ठिकाणी पोलीस विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. त्याची यादी त्यांनी महापालिकेस दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आणि पोलीस अधिकारी यांच्या समन्वयाने पुढील आठवड्याभरात तीव्र गतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त जाखड यांनी सांगितले.
कल्याणमधील सत्यम बारवर केडीएमसीचा हातोडा
By मुरलीधर भवार | Published: June 27, 2024 6:50 PM