कल्याण - कल्याण डाेंबिवली महापालिका विविध कारणावरुन चर्चेत असते. ती आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महापालिका प्रशासनाने सफाई कामगारांच्या बदलीचे आदेश काढले. या बदली आदेशात दाेन मृत आणि आठ सेवानिवृत्त झालेल्या कामगांराचा समावेश हाेता. ही चूक निदशर्नास येताच प्रशासनाने आदेश काढलेली यादी तात्काळ रद्द करुन नव्याने दुसरी यादी काढली आहे.
महापालिका प्रशासनाने १७ मार्च राेडी १५९ सफाई कामगारांची बदली केली. या बदलीचे आदेश महापालिकेने काढले. यादीत दाेन मृत आणि आठ सेवा निवृत्त कामगारांच्या नावाचा समावेश हाेता. ही यादी साेशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली. काेणत्या प्रभागात किती सफाई कामगार काम करतात. याची यादी प्रभाग अधिकाऱ्याकडून पाठविली जाते. त्यानंतर काेणत्या कामगारांची यादी प्राप्त झाली. तिची शहानिशा करुन त्या बदली कामगारांच्या यादीवर महापलिकेच्या सामान्य प्रशासनाकडून शिक्कामाेर्तब केले जाते. त्यानंतर जबाबदार अधिकारी त्या यादीवर सही करतात. त्यावर दिलेला आदेश केव्हापासून अंमलात येईल याचा स्पष्ट उल्लेख तारखेसह केला जाताे.
बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या विराेधात कारवाई केली गेली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश ताटे यांनी केली आहे. दरम्यान ज्या दिवशी हे आदेश काढले. त्याच दिवशी चूक लक्षात आल्याने ते आदेश रद्द करुन नव्याने आदेश काढले असल्याचे उपायुक्त अर्चना दिवे यांनी स्पष्ट केले आहे.
म्युन्सीपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष सचिन बासरे यांनी सांगितले की, काढलेल्या आदेशात दाेन मृत आणि आठ सेवा निवृत्त कामगारांची नावे हाेते. तर हे ही पाहिले पाहिजे की, आस्थापना विभागातून या कामगारांचा पगार काढला जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचीही चाैकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे.