कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेने सीएसआर फंडातून बारावे येथे उभारलेल्या प्रकल्पात प्लास्टीक पासून इंधन तेल तयार करण्यात यश आले आहे. या प्रकल्पाची काल चाचणी घेण्यात आली. पहिल्याच चाचणीत प्रकल्पात प्लास्टीक पासून ८५ लिटर इंधन तेलाची निर्मिती केली आहे. रिसेल व्हॅल्यू नसलेले प्लास्टीक वापरून इंधन तेलाची निर्मिती केली आहे. महापालिकेस सीएसआर फंड प्राप्त झाला होता. महापालिकेने बारावे येथे प्लास्टीक पासून इंधन तेलाचा प्रकल्प उभारला आहे. रुद्र इन्व्हारमेंट सोल्यूशन लिमीटेड आणि कल्याण डोंबिवली महापालिका हा प्रकल्प संयुक्त विद्यमाने चालविणार आहे.
इंधन तेलाची यशवी निर्मिती करण्यासाठी महापालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे परवानगी मागितली आहे. प्रकल्पास महापालिकेने जागा दिलेली आहे. प्रकल्पाची क्षमता एक टन प्लास्टीकपासून ५०० लीटर इंधन तेल तयार करण्याची आहे. या इंधन तेलाचा वापर कंपन्यांमधील बॉयलरसाठी केला जाऊ शकतो. वाहनांमध्येही त्याचा वापर होऊ शकतो का याची चाचणी सध्या सुरु आहे. हा प्रकल्प महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या प्रयत्नांतून उप अभियंता मिलिंद गायकवाड यांनी पूर्णत्वास नेला आहे.
महापालिकेने प्रत्येक रविवारी विविध संकलन केंद्रावरती कचरा संकलनाची मोहिम सुरु केली आहे. संकलीत कच:यातील प्लास्टीक वेगळे करणो महत्वाचे आहे. महापालिकेने महिन्यातील चार रविवार ठरवून दिले आहे. महिन्याच्या पहिल्या रविवारी ई वेस्ट, दुस:या रविवारी कापड, तिस:या रविवारी काच कागद आणि चौथ्या रविवारी फर्निचर आणि फूटवेअर वेस्ट गोळा केले संकलित केले जाणार आहे. प्रत्येक रविवारी प्लास्टीक कच:याचे वर्गीकरण केले जाणार आहे. प्लास्टीक कचरा हा किमान १०० टनार्पयत येतो. मात्र त्यापैकी केवळ पाच टन प्लास्टीक कचरा हा सिद्धी वेस्ट टू ग्रीन लिमिटेड या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वेगळा केला जात आहे. ज्या प्लास्टीकला बाजारात किंमत नाही. त्या प्लास्टीकपासून हे इंधन तयार केले जाणार आहे. प्लास्टीक कचरा वर्गीकरणासाठी महापालिकेने पाच किलो प्लास्टीक कचरा आणून दिल्यास पोळीबाजीचे कूपन दिले जाणार आहे. त्यातून कचरा वर्गीकरणास चालना मिळणार आहे. त्यातून प्रकल्पासाठी पुरेसे प्लास्टीक मिळू शकते.