डोंबिवली : नकारात्मक दृष्टिकोन काहीच चांगले काम करणार नाही, पॉझिटिव्ह दृष्टिकोनच आपल्याला मार्ग दाखवेल. मुंबई-गोवा महामार्गाबाबत लोक काय म्हणतात याचा विचार नका करू, सकारात्मक विचार करण्याची मानसिकता ठेवा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणवासीयांना केले.
सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन आणि कोकण विकास समिती यांच्यावतीने सध्या गाजत असलेल्या मुंबई-गोवा रखडलेल्या महामार्गाबाबत डोंबिवली जिमखाना सभागृहात रविवारी खुल्या चर्चासत्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कोकणवासीय आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्णत्वासाठी गेली १० ते १२ वर्षे पाठपुरावा करणाऱ्या कोकणातल्या विविध संघटनादेखील सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी मंत्री चव्हाण बोलत होते.
या महामार्गाच्या कामाला तसेच हा प्रकल्प बीओटीवर द्यायला मी मंजुरी दिली नाही. ती दुसऱ्यानेच दिली. पण एक कोकणी म्हणून २००९ पासून विधिमंडळात हा महामार्ग झालाच पाहिजे यासाठी भांडतोय. महामार्गाच्या कामात कोणी आडवा आला तर सोडणार नाही हे सभागृहात सांगणारादेखील मीच होतो. आता पाच वर्षांसाठी मंत्री म्हणून मला संधी मिळाली आहे. कोकणवासीयांना न्याय मिळवून देणार, असे ते म्हणाले.
केवळ पैशांनी कामे होत नाहीतमाझी वृत्ती खिलाडू आहे. मैदान सोडून जाण्याची तमा मी बाळगली नाही. शेवटपर्यंत जे खेळलो ते जिंकण्यासाठीच. महामार्गाबाबत माझी भममिका पॉझिटिव्ह आहे. केवळ पैशांनी कामे होत नाहीत, सकारात्मक भूमिकादेखील असावी लागते, असेही चव्हाण म्हणाले.
ऑडिट होणारगेली १० ते १२ वर्षांपासून महामार्गाचे काम रखडले होते. काम पूर्ण झाल्यावर आधीचे काम का रखडले होते, दिरंगाई का झाली, याबाबतचे ऑडिट केले जाणार असल्याचे चव्हाण यांनी यावेळी केले.