कल्याण-कराड-मुंडे, अबू-आैरंगजेब, खोक्या, कबर, नागपूर, दिशा व आत्ता कुणाल कामराची रिक्षा...अशा प्रकारे बजेटवर गहन चर्चा होऊन अनेक लोकहिताचे निर्ण घेऊन बजेट अधिवेशन संपणार लाेकांच्या पदरात काय पडले ? असा सवाल मनसेचे नेते राजू पाटील यांनी उपस्थित करीत महायुतीवर टिकेचा निशाणा साधला आहे.कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाणे गायले. ते गाणे प्रचंड व्हायरल झाले. त्यामुळे या गाणावरुन राजकारण चांगले तापले. हा विषय आत्ता राजकीय चर्चेचा ठरला आहे. या विषयाला धरुन मनसेचे नेते पाटील यांनी ट्वीट करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीला टिकेचे लक्ष्य केले आहे.
मनसेचे नेते पाटील यांनी सांगितले की, कुणाल कामरा संदर्भात मी जे ट्वीट केले आहे. ती क्लीप जानेवारी महिन्यातील आहे. ते ट्वीट चांगले वाईट हा वेगळा मुद्दा आहे. पण तुम्ही बघाल की, अधिवेशन सुरु झाल्यापासून तो आबू आझमी आला. कराड-मुंडे आले. आैरंगजेब आला. त्यानंतर दीशा सालियन आली. हे विषय भरकावटण्यासाठी किंवा काही कारण असेल ही क्लीप आली. एकंदरीच खूप दिवसांनी अधिवेशन पूर्ण काळ सुरु हाेते.
अधिवेशनात महत्वाचे प्रश्न सुटतात. परंतू ही दोघांची इच्छा नाही का ? असा सवाल उपस्थित करीत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली आहे. त्याचबराेबर एकतर लाडकी बहिण योजना फ्ला’प गेली आहे. सरकारच्या तिजोरीत पैसा नाही. या महत्वाच्या गोष्टीत अधिवेशनाच्या चर्चेत उघडकीस येतील म्हणून हा केलेला खेळ आहे. त्याच रागापोटी विचारांती मी एक ट्वीट केले. झाले, संपले अधिवेशन लोकांच्या पदरात काय पडले ? या अनुषंगाने मी ते ट्वीट केले आहे.