शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी जमीन अधीग्रहण तातडीने करणार, रेल्वे मंत्रालयाची अंतिम मंजुरी

By अनिकेत घमंडी | Published: February 02, 2023 6:13 PM

कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने अंतिम मंजूरी दिली असून, जमीन अधिग्रहणाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून मध्य रेल्वे प्रशासनाला पत्र पाठविण्यात येणार आहे.

डोंबिवली:  कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने अंतिम मंजूरी दिली असून, जमीन अधिग्रहणाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून मध्य रेल्वे प्रशासनाला पत्र पाठविण्यात येणार आहे. तर ८० टक्के जमीन ताब्यात आल्यानंतर मुरबाड रेल्वेमार्गासाठी निविदा काढण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे दिली. त्याचबरोबर पहिल्या टप्प्यातील कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गानंतर दुसऱ्या टप्प्यात मुरबाड ते नगर आणि मुरबाड ते पुणे असे दोन रेल्वेमार्ग मंजूर करण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. त्याबाबतही रेल्वेमंत्र्यांनी शाश्वत केले, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.

भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकरशेठ यांचे मुरबाड हे गाव आहे. मात्र, या गावाला रेल्वे पोचण्याचे स्वप्न १७० वर्षांनंतर पूर्ण होणार आहे. अनेक वर्ष प्रयत्न केले जात होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच मुरबाड रेल्वेला हिरवा कंदील मिळाला. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेचा प्रस्ताव मंजूर केला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेसाठी महाराष्ट्राच्या वाटा उचलण्यास मान्यता दिल्यामुळे रेल्वे प्रकल्प पूर्ण होणार आहे. याबद्दल आपण त्यांचे आवर्जून आभार मानत आहोत, असे केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले.

जमीन अधिग्रहणासाठी रेल्वे मंत्रालयाकडून दोन दिवसांत मध्य रेल्वेला पत्र पाठविण्यात येईल. त्यानंतर जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होईल. जमीन अधीग्रहण पूर्ण झाल्यानंतर रेल्वेची निविदा काढण्यात येईल. त्यानंतर या मार्गाचे काम सुरू करण्यात येईल, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. त्याचबरोबर या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात मुरबाड ते नगर आणि मुरबाड ते पुणेपर्यंत दोन रेल्वेमार्ग मंजूर करण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे केली. त्याबाबतही रेल्वेमंत्र्यांनी शाश्वत केले आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.कल्याण व मुरबाड तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व लोकप्रतिनिधींना साथीला घेऊन सुमारे दीड महिन्यांत जमीन अधीग्रहण करण्याचा प्रयत्न आहे. सुमारे ८० टक्के जमीन अधीग्रहीत झाल्यावर निविदा काढता येईल. त्यानंतर काम होईल. मात्र, २०२४ पूर्वी काम सुरू होईल. या मार्गासाठी ९६० कोटी रुपये खर्च असून, राज्य सरकारकडून ५० टक्के खर्च उचलण्याची हमी देण्यात आली आहे, असे पाटील यांनी सांगितले.

कल्याण स्टेशनचे सुशोभिकरण

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व ठाणे रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर कल्याण जंक्शन रेल्वे स्थानकाचा विमानतळाप्रमाणे विकास व सुशोभिकरणाला मंजुरी मिळावी, यासाठी माझ्याबरोबरच खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याण