कल्याण - पश्चिमेकडील महात्मा फुले पोलिस चौक पोलिस ठाण्यातील महिला पोलिसांसाठी महिला दिनानिमित्त महिलांचे मानसिक आरोग्य या विषयावर मानसोपचार तज्ञ डॉ. प्रियांका धर्माधिकारी यांनी व्याख्यानं घेतले.
स्त्रियांच्या विविध वयामध्ये होणारे होर्मोनल बदल आणि त्यामुळे मानसिकतेमध्ये होणारे बदल डॉ. धर्माधिकारी यांनी उपस्थित महिला पोलिसांना समजावून सांगितले. सुपरवुमन सिंड्रोम म्हणजेच, महिलांना एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि मग त्यातून निर्माण होणाऱ्या तणावाला कस ओळखायचं हे समजवण्यात आले.
समाजसेविका दीपाली गुरव आणि समुपदेशक मिथुन राजगुरू यांनी देखील मार्गदर्शन केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख आणि शैलेश साळवी त्याचबरोबर पोलिस उपनिरीक्षक स्वाती जगताप आणि प्रतिभा माळी ह्यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.