कल्याण: कल्याण डोंबिवली शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने दुकानदारांना वेळेचे निर्बंध घालून दिले आहेत. यामध्ये शनिवारी व रविवारी पी१ व पी२ अश्या पध्दतीने दुकाने सुरू ठेवावी असा देखील नियम आहे. या निर्णयाला कल्याण पाठोपाठ डोंबिवलीतील व्यापा-यांनी सुद्धा विरोध दर्शविला असून यांबाबत केडीएमसी आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांना पत्राद्वारे आपले म्हणणे मांडले आहे. यामध्ये दुकानांची वेळ सकाळी 10 ते रात्री 9 करावी असे देखील नमूद करण्यात आले आहे.
केडीएमसीने दुकानांबाबत घेतलेल्या निर्णयावर कल्याण डोंबिवलीतील व्यापा-यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रामुख्याने शनिवारी आणि रविवारी हे दोन दिवस व व्यवसायाच्या दृष्टीने आमच्यासाठी महत्त्वाचे आहे असे व्यापारी सांगतात. त्यामुळे केडीएमसी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी हे यावर काय निर्णय घेतात ते पाहावे लागेल.