डोंबिवली: कसारा-उंबरमाळी दरम्यान तांत्रिक बिघाडामूळे अप दिशेची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत ठप्प. त्या मार्गावर ट्रॅकमध्ये खड्डा पडल्याने वाहतूक खोळंबली असल्याचे प्रवासी संघटनेचे राजेश घनघाव यांनी सांगितले.
वंदे भारत पुढे काढण्यासाठी गोरखपूर सुपरफास्ट एक्सप्रेस खर्डी मध्ये थांबवून ठेवण्यात आली आहे. एक लोकल वेगमर्यादा ठेवून घटनास्थळावरून पुढे नेण्यात आली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.