कल्याण-मदन गड संवर्धन माेहिम गिरीमित्र प्रतिष्ठान संस्थेतर्फे नुकतीच पार पडली. या दोन दिवसीय मोहिमेत ८ सदस्यांनी सहभाग घेतला. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एकमेव वनदुर्ग असलेल्या वांजळे गावच्या मागच्या बाजूला मदगड आहे.
रितसर महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाची पत्र देऊन परवानगी घेण्यात आली होती रात्रीचा गाडीने प्रवास करून संस्थेचे सदस्य मध्यरात्री वांजळे गावात पोहचले, पहाटे पर्यंत थोडा वेळ गावातील मंदिरात आराम करून सकाळी चहा - नाश्ता उरकून काम करायचे सर्व साहित्य आणि दुपारच्या जेवणाचे सगळे सामान घेऊन मदगड किल्ल्यावर पोहचले. कुठे आणि काय काम करायचे आहे याची पाहणी आणि नियोजक करून सकाळी कामाला सुरुवात झाली. किल्ल्यावरील वाड्यांचे जोत्यावर वाढलेली झाडी - झुडपे काढण्यात आली आणि सर्व परिसर मोकळा करण्यात आला.
दुपारचे जेवण करून परत एकदा जोमाने कामाला सुरुवात झाली संध्याकाळ पर्यंत नियोजन केले होते त्याच्या पेक्षा कैपटीने जास्तच काम सदस्यानं करण्यात आले होते. संध्याकाळी दिवसभराचे काम थांबाऊन सगळे सदस्य गावात परत आले. गावच्या सरपंचांना भेटून दिवसभर केलेल्या कामाची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी सदस्य गडाकडे मार्गस्थ झाले. किल्ल्यावर करतं असलेले संवर्धनाचे काम बघायला ७५ वर्षाचे वांजळे गावाचे सरपंच आत्माराम गायकर, बोर्ली पंचायतन शिवसेना शाखाप्रमुख गजू भाटकर यांनी भेट देऊन काम करणाऱ्या सदस्यांचा उत्साह वाढवला होता. या मोहिमेत वांजळे गावाचे उत्साही ग्रामस्थ भालचंद्र जाधव यांनी सहभाग घेतला. मोहिमेत गिरीमित्र प्रतिष्ठान संस्थेचे मंगेश कोयंडे, दिगंबर पाटील, अनिश खाडे, राजू घोळे, मंगेश ठाकूर, शहाजी घाग, हेमंत लाड आणि आरती गुरव सहभागी झाले होते.
मदगड किल्ल्याचे संवर्धन व्यवस्थित झाले तर हा किल्ला पर्यटनाचे केंद्रबिंदू होऊ शकतो. वांजळे गावाला एक वेगळी ओळख निर्माण होईल. अनेक पर्यटक आणि ट्रेकर या किल्ल्याला भेट देतील आणि गावातील आणि परिसरातील लोकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होईल. ह्या किल्ल्यापासून काही अंतरावर दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर ही निसर्गसंपन्न पर्यटन गावं आहेत आणि हा किल्ला अग्रस्थानी असेल.