कल्याण- शिवसेना प्रणित म्युन्सीपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने आज महाराष्ट्र बंदच्या पाश्र्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयातील कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी बाजारपेठ पोलिसांनी मुख्यालयात धाव घेतली. पोलिस आणि कामगार संघटनेच्या पदाधिका:यांमध्ये वादंग झाला.
संघटनेचे उपाध्यक्ष रवी पाटील आणि सचिन बासरे यांनी आज महापालिका मुख्यालयात जाऊन महाराष्ट्र बंद असल्याने कामगारांनी कामकाज बंद ठेवा असे आवाहन केले. यावेळी कामगारांना कार्यालया बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब कळताच मुख्यालयात बाजारपेठ पोलिसांनी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी पाटील आणि बासरे यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिस आणि त्यांच्यात वादंग झाला. बंदला महाविकास राज्य सरकारचा आघाडीचा पाठिंबा आहे. बंदचे आवाहन करीत असताना कोणीही त्याला विरोध केलेला नसता त्याठिकाणी पोलिस येऊन त्यांनी बंदच्या कामकाजात हस्तक्षेप केला असल्याचा आरोप पाटील आणि बासरे यांनी केला आहे.
दरम्यान आज दुपारी 12 वाजता शिवाजी चौकातील शिवसेना शाखेत शिवसैनिक जमले होते. त्यांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन दुकानदारांना केले. लखीमपूर येथील घटनेचा निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच रस्त्यावर चालणा:या रिक्षा चालकांना थांबवून रिक्षा बंद करण्याचे आवाहन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी संदीप देसाई, उमेश बोरगांवकर आदींनी शिवाजी चौकात लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ निदर्शने केली. महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली ब्रीज दत्त, शकील खान, कांचन कुलकर्णी दुचाकीवरुन पक्षाचे झेंडे हाती घेत शिवाजी चौक, स्टेशन परिसर, खडकपाडा, चिकनघर, सहजानंद चौकातील दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी पोलिसांची जीप पक्षाच्या कार्यकत्र्याचा पाठलाग करीत होती. मात्र कार्यकर्ते कुठेही न थांबता दुकानदारांना दुकाने बंदचे आवाहन करीत होते. काँग्रेच्या काही कार्यकतेा आणि पदाधिका:यांनी शिवाजी चौकात निदर्शने करुन केंद्र सरकारचा निषेध केला.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ५५ बसेस दररोज रस्त्यावर धावतात. मात्र आज महाराष्ट्र बंद असल्याने रस्त्यावर प्रवासी कमी आहेत. त्यामुळे केडीएमटीने आजच्या दिवशी ३३ बसेस रस्त्यावर काढल्या हा्ेत्या. त्यामुळे केडीएमटीला आर्थिक फटका बसणार असल्याची माहिती परिवहनचे सहाय्यक व्यवस्थापक संदीप भोसले यांनी सांगितले.