कल्याण डोंबिवलीमध्ये लखीमपूर खेरी(Lakhimpur Kheri Incident) घटनेचा निषेध महाविकास आघाडीकरून करण्यात आला. एकीकडे या बंद मध्ये डोंबिवलीत शिवसेना दुपारपर्यंत फारशी सक्रिय पाहायला मिळाली नाही. मात्र कल्याणात शिवसैनिक रसत्यावर उतरलेले पाहायला मिळाले. आवाहन करूनही रिक्षा बंद न केल्याने शिवसैनिक संतप्त झाले होते.एकंदरीत कल्याण डोंबिवलीत संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळतोय.
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून आजच्या बंदमध्ये आपण संपूर्ण ताकदीनिशी उतरणार अस स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतरही आज सकाळी शहरातील रिक्षा सुरूच असल्याचे दिसताच शिवसैनिक संतप्त झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर उतरत उपशहरप्रमुख रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन करण्यात आली. शिवसैनिकांकडून रिक्षाचालकांना अर्वाच्य भाषेचा प्रयोग करत रिक्षा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांची समजूत काढत बाजूला केले. मात्र, कल्याण डोंबिवलीत कोरोनां काळात निर्माण झालेले आर्थिक संकट आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळपासूनच रिक्षाचालक नेहमीप्रमाणे बाहेर पडले होते.