कल्याण ग्रामीणमध्ये शिंदे गटाकडून राजेश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तसेच ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष भोईर आणि मनसेकडूनराजू पाटील अशी तिरंगी लढत होती. याच दरम्यान आता शिंदे गटाकडून राजेश मोरे हे विजयी झाले आहेत. त्यांना १४११६४ मतं मिळाली. तर मनसेच्याराजू पाटील यांचा पराभव झाला असून त्यांना ७४७६८ मतं मिळाली.
राजू पाटील यांनी पराभवानंतर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत भावूक पोस्ट केली आहे. "गेली ५ वर्षे तुम्ही अपेक्षेपेक्षा खूप जास्त प्रेम दिलंत, जरी निकाल अनपेक्षित असला तरी स्वीकारायलाच हवा. तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती. माझ्या प्रामाणिक प्रयत्नांची ती खरी पोचपावती असते" असं म्हटलं आहे. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांचे व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.
"निकाल येतील जातील... आपलं प्रेम, आपले ऋणानुबंध कायम राहतील. गेली ५ वर्षे तुम्ही अपेक्षेपेक्षा खूप जास्त प्रेम दिलंत, जरी निकाल अनपेक्षित असला तरी स्वीकारायलाच हवा. तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती. माझ्या प्रामाणिक प्रयत्नांची ती खरी पोचपावती असते. माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या प्रत्येक मतदाराचे आणि माझ्यासाठी अहोरात्र मेहनत केलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार" असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे.
माहीम मतदारसंघातून मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांचा पराभव झाला असून या मतदारसंघात ठाकरे गटाचे महेश सावंत यांचा ९४४ मतांनी विजय झाला आहे. या विजयानंतर अमित ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माहीम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य आहे. आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला, तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो. आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; एक नवी सुरुवात आहे असं अमित ठाकरेंनी म्हटलं.