कल्याण-देशाचे पंतप्रधान पाच ट्रिलीयन डॉलरचे ध्येय साध्य करण्याचे ध्येय डोळ्यासमाेर आहे. त्यापैकी एक ट्रीलियन डॉलरचे ध्येय महाराष्ट्र साध्य करणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केला. निती आयोगाने मुंबई एमएमआरडीए रिजनमध्येच एक ट्रीलीयन डॉलरची क्षमता आहे. तर महाराष्ट्रात किती असेल या गोष्टीचा उल्लेख मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला. पुढे बोलताना कल्याण डोंबिवलीत क्लस्टरची गरज आहे. त्यामध्ये बिल्डरांनी सहभागी व्हावे असे आवाहन एमसीएचआयला केले.
कल्याण पश्चिमेतील फडके मैदानात क्रेडाई एमसीएचआय या बिल्डर संघटनेच्या वतीने १३ व्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाला मुख्यमंत्री शिंदे यांनी आज सायंकाळी भेट दिली. यावेळी एमसीएचआयचे अध्यक्ष भरत छेडा, माजी अध्यक्ष रवी पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. ९ मीटर रस्त्यालगत असलेल्या इमारतीना आठ माळ्याची परवानगी द्यावी अशी मागणी एमसीएचआयने यावेळी केली. या मागणीला मान्यात देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.
दावोस येथे पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्रा गुंतवणूक करणाऱ््या गुंतवणूकदारांनी ७ लाख ७३ हजार कोटीचे सामंजस्य करार केले. मागच्या वर्षी १ लाख ३७ लाख कोटीचे करार केले गेले. त्यापैकी ८० टक्के कराराची अंमलबजावणी झाली. राज्यात पायाभूत सोयी सुविधा, कनेक्टीव्हीटी, कौशल्यपूर्ण मनुष्यबळ यामुळे गुंतवणूकदारांकडून महाराष्ट्राला पसंती दिली जात असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यानी सांगितले.
मुंबई ठाण्या पाठोपाठ कल्याणमध्ये घर घेण्यास नागरीकांची पसंती आहे. याठिकाणी दुर्गाडी खाडी पूलाचे विस्तरीकरण करण्यात आले आहे. भिवंडी-कल्याण -शीळ फाटा रस्त्याचे सदा पदरीकरण करण्यात आले आहे. कोन ते शीळफाटा या दरम्यान डबल डेकर उन्नत मार्ग तयार केला जाणार आहे. रिंग रोड प्रकल्पाचे काम सुरु आहे. कल्याण डाेंबिवलीत विकासाला वाव आहे. एमसीएचआय संघटनेशी संबंधित बिल्डर केवळ पैसा कमावित नाही. तर त्यांचे शहराच्या विकासातही योगदान आहे. साईक विकास नियंत्रण नियमावली तयार केली आहे. सरकार विविध सोयी सुविधा देत आहे. त्यामुळे तुम्ही इंच इंच खेळू नका तर मैदानात या. नागरीकांना परवडतील अशी घरे वेळेत पूर्ण करुन देणाऱ््या बिल्डरांचाही सत्कार करा असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री शिंदे यांनी घरोंदा चित्रपटातील दोन दिवाने शहर मे या गाण्याचा आधार घेत ग्राहकांना घर देताना सगळ्या सोयी सोयी सुविधा एमसीएचआय या प्रदर्शनाच्या माध्यमातून एका छताखाली उपलब्ध करुन देत असल्याचा उल्लेख केला.