- सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं- ५ च्या भाटिया चौक पाच दुकान रस्त्यावर सोमवारी सकाळी ट्रकची उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांना धडक झाली. यामध्ये विधुत वाहिण्या तुटून पडल्या तर दोन विधुत खांब वाकले असून सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
उल्हासनगर कॅम्प नं-५ भाटिया चौक, पाच दुकान परिसरात सोमवारी सकाळी ऐक ट्रक भरधाव वेगाने जात होता. ट्रॅकचा उंच भागात जिवंत विधुत वाहिण्या अडकल्याने, त्या तुटून खाली पडल्या. तसेच दोन पेक्षा जास्त विधुत खांब रस्त्यावर वाकले. जिवंत विधुत वाहिण्या रस्त्यावर पडल्याने, मोठी दुर्घटना टळली आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती महावितरण विभागाला देऊन काहीकाल रस्त्यावरील वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविली.
सावधगिरीचा उपाय म्हणून महावितरण विभागाने त्वरित पाच दुकान रस्त्यावरील विद्युत पुरवठा खंडित केला. तसेच ट्रक रस्त्यावर उभा असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. ट्रक चालकावर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.