डोंबिवली - देसलेपाडा येथील गायकवाड कुटुंबातील पाच जणांचा संदप गावातील खदाणीत बुडून मृत्यू झाल्याची घटना 7 मे ला घडली होती. बुधवारी त्या कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करायला गेलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना आम्हाला मदत नको, पाणी दया अशा शब्दात खडे बोल कुटुंबाने सुनावले. संतापलेले कुटुंब आणि त्यावेळी झालेला गोंधळ पाहता आठवलेंना तेथून काढता पाय घ्यावा लागला.
पाच जणांच्या बाबतीत घडलेल्या दुर्घटनेनंतर गावातील पाणी टंचाईची समस्या प्रकर्षाने समोर आली होती. दरम्यान आतार्पयत खासदार, आमदार आणि राजकीय पक्षातील पदाधिका-यांनी गायकवाड कुटुंबियांची भेट घेऊन पाणी देण्याचे आश्वासन दिली. पाणी टंचाईमुळे कुटुंबातील पाच जणांचा जीव गमवावा लागला पण राजकारणी केवळ आश्वासन देतात पण पाणी काही देत नाहीत, आजही पाणी विकत घेऊनच त्याचा वापर करावा लागत आहे हा संताप बुधवारी गायकवाड कुटुंबानी बोलून दाखविला.
गायकवाड कुटुंबियांच्या सांत्वनासाठी जेव्हा आठवले आले तेव्हा त्यांनी गावाला भेडसावणा-या पाणी समस्येबाबत मार्ग काढण्यासाठी आयुक्त तसेच जिल्हाधिका-यांशी चर्चा केल्याचे सांगितले, पुढे बोलताना आठवलेंनी कुटुंबाला 50 हजार रूपयांची मदत करण्याचे आश्वासन देताच कुटुंबातील सदस्य संतापले ‘आम्हाला 50 हजार नको, पाणी द्या’ आमच्या घरातले जीव पाण्यावाचून गेलेत ते भरून तुम्ही देणार आहात का? दुर्घटना घडल्यानंतर पाणी मिळणे गरजेचे होते पण आमदार खासदार आले पण केवळ आश्वासन देऊन गेले. पण काही केले नाही. आजही आम्ही पाणी विकत घेतोय, पुन्हा अशा घडणार नाहीत याची दक्षता घ्या, खदाणी बंद करा, त्याला कुंपण घाला, लॉक करा, आम्हाला देणगीची गरज नाही, पाण्याची गरज आहे. तुम्ही येता सगळे सांत्वन करण्यासाठी ते आम्हाला पटत नाही अशा शब्दात आठवले यांना कुटुंबातील सदस्यांनी सुनावले. यावेळी अनपेक्षित झालेल्या गोंधळाने रिपाईचे पदाधिकारी आणि पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाल्याचे पहायला मिळाले. तर संभाजी राजे शिवसेनेत जातीलछत्रपती संभाजी राजेंना यांना कोणत्या पक्षात जायचे असेलतर तो त्यांचा अधिकार आहे. मात्र शिवसेना राज्यसभेची उमेदवारी देत असलेतर ते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांना यापुर्वी भाजपने राज्यसभा दिली होती. त्यामुळे त्यांनी भाजपमध्येच राहीले पाहिजे असा सल्लाही आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.