मुरलीधर भवार-कल्याण: कल्याण- उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले निष्ठावतांच्या उरावर बाहेरुन येऊन कोणी बसणार हे त्यांच्या पक्षातील निष्ठवतांना मान्य होणार नाही. ते त्यांनी मान्य करु ही नये असा चिमटा शिंदे सेनेचे कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी उद्धव सेनेला काढला आहे. तसेच साईनाथ तारे हे शिंदे सेनेते सक्रीय नव्हते. त्यांच्याकडे शिंदे सेनेचे कोणतेही पद नव्हते. ते ठाणे जिल्हा प्रमुख असल्याची माहिती चुकीची असल्याचा खुलासाही आमदार भोईर यांनी केला आहे.साईनाथ तारे यांनी शिदे सेनेला सोडून उद्धव सेनेत प्रवेश केल्याने आमदार भोईर यांनी ही वक्तव्ये केली आहेत.
कल्याणमधील व्यावसायिक आणि शिवसेना माजी नगरसेविकेची पती साईनाथ तारे यांनी आज उद्धव ठाकरे आणि पक्षाचे नेते विजय साळवी यांच्या नेतृत्वात उद्धव सेनेत प्रवेश केला आहे. साईनाथ तारे हे शिंदे सेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख असल्याची माहिती देण्यात आली होती. साईनाथ तारे यांनी उद्धव सेनेेत प्रवेश केल्यानंतर शिंदे गटाचे आमदार भोईर यांनी खुलासा केला आहे. उद्धव सेनेतील पदाधिकारी तारे यांच्या पक्ष प्रवेशाच्या आधी बैठक घेऊन पक्ष प्रमुखांना ठराव पाठविला होता. त्यात तारे यांना कोणतेही पद देण्यात येऊ नये. लोकसभा निवडणूकीत त्यांनी उद्धव सेनेच्या विरोधात काम केले होते.
त्याना निवडणूकीची उमेदवारी देण्यात येऊ नये असे म्हटले होते. या वादंगावर आमदार भोईर यांनी उद्धव सेनेला चिमटाच काढला आहे. शिवसेना फूटीनंतर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साेबत गेलो. उद्धव सेना यांना मानणारे हे त्यांच्यासोबत त्यांचे निष्ठावान म्हणून राहिले. उद्धव सेनेत बाहेरुन कोणी येत असेल तर त्या पक्षातील निष्ठावंतांना कसे काय चालणार. बाहेरुन आलेला व्यक्ती निष्ठावंताच्या उरावर बसणार हे त्यांना मान्य होणार नाही. ते त्यांनी मान्य करु नये असा सल्लाही आमदार भोईर यांनी उद्धव सेनेसह निष्ठावंतांना दिला आहे.