मुरलीधर भवार, कल्याण:कल्याणडोंबिवली महापालिकेच्या हद्दीत कोट्यावधी रुपयांच्या निधीतून एमएमआरडीएकडून रस्ते विकासाची कामे सुरु आहेत. मात्र या कामात अनेक त्रूटी समोर आल्या आहेत. या त्रूटी दूर करण्यासाठी महापालिकेचे शहर अभियंता अर्जून अहिरे यांनी आज एक बैठक आयोजित केली गेली. या बैठकीबाबत एमएमआरडीएच्या अधिकारी वर्गाकडून अनास्था दाखविण्यात आल्याने महापालिका प्रशासन चांगलेच तापले आहे. एमएमआरडीएला कामातील त्रूटी दूर करण्यात स्वारस्य नसल्या त्रूटी असलेली कामांना महापालिका मान्यता देणार नाही. शिवाय ते रस्ते हस्तांतरीत करुन घेणार नाही.,असा इशारा महापालिकेने एमएमआरडीएला दिला आहे.कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत पाच प’केजमध्ये जवळपास कोट्यावधी रुपये खर्चाची कामे सुरु आहेत. काही ठिकाणी जलवाहिन्या शिफ्ट केलेल्या नाहीत. काही ठिकाणी सेवा वाहिन्या शिफ्ट करण्याचे काम बाकी आहे.
अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनची समस्या आहे. या संदर्भात अनेक नागरीकांसह लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारी लक्षात घेता त्यावर तोडगा काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीसह महापालिका अधिकारी आणि एमएमआरडीएचे अधिकारी, कंत्राटदार, सल्लागार यांची एक बैठक महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आयोजित केली होती. या बैठकला सल्लागार आणि पीएमसी उपस्थित होते. कंत्राटदार आणि अभियंते आणि एमएमआरडीएचा मोठे अधिकारी उपस्थित नव्हते. केवळ एका प’केज कामाच्या इंजिनिअर उपस्थित होत्या. हे पाहून महापालिकेचे माजी नगरसेवक संतापले. याविषयी शहर अभियंता अर्जून अहिरे यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जी कामे सुरु आहेत. त्या कामात काही त्रूटी राहिल्यास त्याला कोण जबाबदार आहे. त्या त्रूटी दूर करण्यासाठी बैठक बोलाविली जाते. त्यासाठी एमएमआरडीएचे अधिकारी गांभीर्य दाखवित नाही. ते गैर हजर राहतात. ही गंभीर बाब आहे. कामानंतर काही त्रूटी निघाल्यास ते काम मान्य केले जाणार नाही. त्रूटी युक्त तयार केलेले रस्ते महापालिका एमएमआरडीएकडून हस्तांतरीत करुन घेणार नाही. असा पत्र व्यवहार महापालिका एमएमआरडीएला करणार आहे. या संदर्भात भाजपचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर आणि मंदार हळबे यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.