कल्याण-कल्याण शीळ रस्त्याच्या सहापदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम गेल्या दोन वर्षापासून संथ गतीने सुरु आहे. त्याचा त्रस वाहन चालकांसह प्रवाशांना सहन करावा लागतो. ही परिस्थिती कायम राहिली तर लोक आम्हाला घरी येऊ देणर नाहीत अशी संताप मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला आहे.
कल्याण शीळ रस्त्याचे काम संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांना कामावर जाण्यास वेळ होते. या मार्गाने अनेक चाकरमानी नवी मुंंबई, पनवेल, ठाणो याठिकाणी कामाला जाताता. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा वारंवार आरोप करुन चौकशीची मागणी करुन देखील त्याची चौकशी केली जात नाही. रस्त्याचे काम करणा:या ठेकेदाराची मनमानी सुरु आहे. त्याच्याकडून रस्त्यावर काम करीत असताना सुरक्षिततेची उपाययोजना आखली जात नाही. अनेक ठिकाणी रस्त्यावर तडे गेले आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाच्या प्रश्न उपस्थीत झाला आहे. काटई येथील टोल नाका बंद आहे. हा टोल नाका हटविण्याची मागणी वारंवार केली.
या टोल नाक्याच्या पूढेच शीळच्या दिशेने दिवा पनवेल मार्गावरील जुना आणि नवा उड्डाणपूल आहे. त्याठीकाणी नाहक वाहतूक कोंडी होत आहे. संथ गतीने काम सुरु असलेल्या रस्त्याच्या ठेकेदारासोबत बहुधा सत्ताधा:यांची भागीदारी असावी असा आरोपही आमदार पाटील यांनी केला आहे. त्यामुळे कामावर कोणाचा अंकुश नाही. या भागाचा मी आमदार आहे. याच रस्त्यावरुन मला ये जा करावी लागते. रस्त्याच्या कामाविषयी अशी स्थिती राहिल्यास लोक आम्हाला घरी येऊ देणार नाही असा संताप पाटील यांनी व्यक्त केला आहे. रस्त्याचे काम ज्या ठीकाणी सुरु आहे. त्याठिकाणी रस्त्यावर खड्डे आहेत. ग्रामपंचायतीपासून सर्वच कामांचे श्रेय घेणा:या सत्ताधा:यांनी रस्त्यावरील खड्डय़ांचेही श्रेय घ्यावे असा टोलाही सत्ताधाऱ्यांना आमदार पाटील यांनी लगावला आहे. सत्ताधाऱ्यांना टक्केवारीच्या राजकारणात रस असल्याने नागरीकांच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या कल्याण शीळ रस्त्याच्या कामाकडे लक्ष देण्यास वेळ नाही याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे.