कल्याण-कल्याण शीळ रस्त्यालगत असलेल्या टाटा नाका परिसरातील देशमुख होम्समधील सोसायटीत राहणाऱ्यांना नागरीकांना पाणी टंचाईची सामना करावा लागत आहे. गेल्या 120 दिवसापासून सोसायटीत पाणी आले नसल्याने सोसायटीला टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. या प्रकरणी आज मनसे आमदार राजू पाटील यांनी देशमुख होम्सला भेट दिली. यावेळी संतप्त महिलांनी पाणी टंचाईचे गा:हाणो आमदारांकडे मांडले. सोसायटीची पाण्याची समस्या लवकरच सोडविली जाईल असे आश्वासन आमदार पाटील यांनी यावेळी दिले आहे. या प्रसंगी सोसायटीच्या वंदना सोनावणो, समृद्धी चाळके, अमरसेन चव्हाण, धीरज राजाभोज, सत्यवान पाटील, धेून राठोड, सुरेंद्र राठोड, संतोष सुतार, चेतन चव्हाण आदी उपस्थित होते. देशमुख होम्स सोसायटीतील 1300 लोक राहतात. या सोसायटीला गेल्या 120 दिवसापासून पाणी पुरवठा झालेला नाही. पाणी पुरवठा बंद असल्याने सोसायटीतील नागरीक टँकर मागवून त्यांची तहान भागवित आहे.
टँकरने किती दिवस पाणी मागविणार. भर पावसाळ्य़ात या नागरीकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यावर तोडगा काढण्यासाटी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्याकडे या नागरीकांनी धाव घेतली. आमदार पाटील यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंते राजीव पाठक यांनाही बोलावून घेतले होते. पाण्याचा प्रेशर कमी आहे. यापूर्वीही एमआयडीसीच्या अधिका:यांसोबत पाटील यांनी बैठक घेऊन नागरीकांना पाणी मिळाले नाही तर नागरीकांच्या असंतोषाचा उद्रेक होईल.
नागरीकांच्या प्रश्नावर आंदोलनाचा इशारा दिला होता. देशमुख होम्सही सोसायटी महापालिका हद्दीत असली तरी या सोसायटीला एमआयडीसीकडून पाणी पुरवठा केला जातो. महापालिका बील वसूल करते. ते एमआयडीसीला भरते. मात्र या नागरीकांना पाणी मिळत नाही. त्यावर तोडगा काढण्यासाठी देशमुख होम्सच्या नागरीकांना पाणी पुरवठयाची स्वतंत्र जलवाहिनी टाकून देण्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी यावेळी दिले आहे.