कल्याण- मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिवा शहरातील कामाचा आढावा घेण्यासाठी आज पाहणी दौऱा केला. समस्या जाऊन घेत लवकर ठामे महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली जाणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.दिवा प्रभाग समितीमध्ये अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.बैठकीला ठा.म.पा. उपायुक्त मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, मनसेचे शहर प्रमुख तुषार पाटील, विवेक पोरजी, हर्षद पाटील, रोहिदास मुंडे, दिलीप गायकर, किरण दळवी, जयदीप भोईर, प्रवीण पाटील उपस्थित होते.
आगासन - स्मशानभूमी रोड-हा रस्ता अतिशय खराब झाला असून याच रस्त्यालगत स्मशानभूमी व गणेश घाट आहे. किमान तात्पुरत्या स्वरुपात रस्त्याची डागडुजी करण्यात यावी.आगासन मुख्य रस्ता आगासन मुख्य रस्त्याचे काम सुरु असुन कंत्राटदार योग्य प्रकारे करीत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी व प्रवाशांचे हाल होत आहेत. संबंधित कंत्राटदाराला समज देऊन तातडीने रस्ता पूर्ण करण्याबाबत सूचना द्याव्यात. बेडेकर नगर येथे राहणाऱ्या रहिवाशांना मुख्य रस्त्यावरुन जाण्यासाठी रस्ता किंवा पायवाट नाही. त्यामुळे रहिवाशांचे हाल होत आहेत. येथील अडचणी सोडवून तातडीने रस्ता दुरुस्त करुन द्यावा. रुग्णालय दिवा विभागातील रहिवाशांसाठी महानगरपालिकेचे रुग्णालय नाही. येथील एका जागेवर महानगरपालिकेचे रिझव्हेंशन असून ही जागा सध्या खाली करण्यात आली आहे. येथे अतिक्रमण होऊ नये म्हणून तातडीने महानगरपालिकेकडून रिझर्वेशन फलक लावण्यात यावा...
दिवा नाका येथून दररोज शेकडो प्रवासी ठाणे महानगरपालिका बससेवा किंवा खाजगी वाहनांनी प्रवास करीत असतात त्यांच्यासाठी बसस्टॉप उपलब्ध नाही. दिवा नाका येथे किमान तात्पुरत्या स्वरुपात बसस्टॉप उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी. दिवा पूर्व येथील सदगुरु वाडी येथे रस्ता अडवून भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांसाठी रुग्ण वाहिका, अग्री शामक गाडी जाण्यास अडचणी येत आहेत. तसेच परिसरात पाणी साचत असून याबाबत स्थानिक रहिवाशांनी वारंवार लोकप्रतिनिधीसह महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या आहेत.येथील भिंत तातडीने तोडून स्थानिकांसाठी रस्ता उपलब्ध करुन द्यावा. दिवा पूर्व-पश्चिम कायम स्वरुपी वाहतूकीने जोडण्यासाठी रेल्वे उड्डाण पूलाचे काम हाती घेण्यात आले आहे.सदर काम पूर्ण करण्यासाठी बाधितांच्या पुनर्वसन व जागा अधिग्रहणाबाबत निर्णय घेऊनच काम सुरु करावे. दिवा रेल्वे स्टेशन सोडल्यास इतरत्र कुठेही महानगरपालिकेचे शौचालय नसल्यामुळे नागरिकांनाअडचणीचे ठरत आहे. त्यामुळे दिवा पुर्वेकडील तलावानजीक महानगरपालिकेकडून शौचालय उभारावे अन्यथा BOT तत्त्वावर शौचालय उभारण्यास परवानगी द्यावी. दिवा परिसरातील लोकसंख्येनुसार स्मशानभूमी उपलब्ध नाही. साबे स्मशानभूमीमध्ये केवळ एक बर्निग स्टॅड आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी खोळंबून राहावे लागते. येथील प्रश्न तातडीने सोडवून स्मशानभूमीची कार्यक्षमता वाढविण्यात यावी. दिवा पश्चिमेकडे गावात जाण्यासाठी केवळ स्टेशन वरुन दिवा बंदर रोड उपलब्ध आहे. हा रस्ता अत्यंत खराब झाला असून तातडीने डागडुजी करावी. दिवा परिसरातील वाढती लोकसंख्या व वाहनांच्या सरासरी पाहता येथे वाहतूक पोलीसांची आवश्यकता आहे. याबाबत ठाणे वाहतूक विभागाशी समन्वय साधून वाहतूक पोलीसांची व्यवस्था करावी.दिवा विभागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मुख्य लाईन, अंतर्गत लाईन व टाक्यांच्या जागा निश्चित करुन आराखडा तयार करण्यात आला आहे. परंतु टाक्यांच्या कामासाठी अद्यापही सुरुवात झालेली नाही. त्याबाबत उद्भवलेल्या अचडणी सोडवून टाक्यांना जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. दिवा पश्चिमेकडील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी रेल्वे रुळाखालून पुश थ्री पद्धतीने करण्याच्या कामाला मंजूरी देण्यात आलेली असून सदर काम तातडीने पूर्ण करावे. रिक्षा स्थानक दिवा विभागात येणाऱ्या सर्व रिक्षा स्टेशन लगत येतात त्यामुळे मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी असते. या रिक्षांचे वेगवेगळे विभाग करण्यात यावेत. त्यासाठी यंत्रणा उभारावी.दिव्यामध्ये रहिवासी वस्तीलगत ठाणे महानगरपालिकेकडून गेली अनेक वर्षे कचरा टाकला जातो. याबाबत वारंवार आंदोलने झालेली असून महानगरपालिकेकडू आश्वासन देऊनही अद्यापपर्यंत डंपिंग ग्राऊंड बंद करण्यात आलेले नाही. याबाबत महानगरपालिकेने निर्णय घ्यावा.