शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
3
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
4
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
5
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
6
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
7
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
8
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
9
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
10
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
11
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
12
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
13
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
14
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
16
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
17
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
18
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
19
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
20
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

भिवंडीत खड्ड्यांविरोधात मनसेचे आंदोलन; रांगोळी काढून खड्डयांचे पूजन

By नितीन पंडित | Published: August 21, 2023 5:26 PM

खड्ड्यांभोवती मनसे महिला सैनिकांनी रांगोळी काढून खड्ड्याचे पूजन केले आहे.

नितीन पंडित

भिवंडी : शहरात रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या सर्वत्रच जाणवत आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना खड्ड्यां विरोधात उग्र आंदोलन करण्याचे आदेश दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर मनसे कार्यकर्ते खड्डा विरोधात आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.भिवंडी शहर व ग्रामीण भागात तीन ठिकाणी खड्ड्यां विरोधात सोमवारी आंदोलन करण्यात आले.भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष मनोज गुळवी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष परेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी महानगरपालिका मुख्यालया समोर झालेल्या आंदोलनात पालिका प्रशासनाचा धिक्कार करीत स्वर्गीय आनंद दिघे चौक या ठिकाणी असलेल्या खड्ड्यांभोवती मनसे महिला सैनिकांनी रांगोळी काढून खड्ड्याचे पूजन केले आहे.

या आंदोलनात महिला सेना प्रदेश उपाध्यक्षा उर्मिला तांबे व मनसे पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यानंतर आपले निवेदन पालिका आयुक्तांकडे सुपूर्द केले आहे. भिवंडी ग्रामीण कार्यकर्त्यांच्या वतीने अंजूर फाटा येथील कामण वसई रस्त्यावर मनसे प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे,जिल्हा समन्वयक मदन अण्णा पाटील,जिल्हा पदाधिकारी संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात शिवनाथ भगत,अँड.अरुण पाटील, संतोष म्हात्रे,दीपक पाटील,कुलेश तरे सहभागी झाले होते. मनसे तालुकाध्यक्ष विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली अंबाडी नाका येथे आंदोलन करीत रस्त्यांवरील खड्ड्यांना जबाबदार प्रशासनाचा धिक्कार करण्यात आला.