शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

"ते" कधीही एकमेकांना डोळा मारतील - मनसे आमदार राजू पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 2:21 PM

शिवसेना भाजप मध्ये सुरू असलेल्या आरोप- प्रत्यारोपावर बोलताना ते कधीही एकमेकांना डोळा मारतील अस देखील पाटील म्हणाले. 

मयुरी चव्हाण : लोकमत न्यूज नेटवर्क 

कल्याण: गेली इतकी वर्षे शिवसेनेकडून कल्याण डोंबिवलीच्या विकासाऐवजी सुरू असणाऱ्य भावनिक खेळाच्या राजकारणाला लोकं कंटाळली असून आगामी केडीएमसी निवडणुकीत मनसे निर्णायक स्थितीत असेल असा ठाम विश्वास मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला. तसेच शिवसेना भाजप मध्ये सुरू असलेल्या आरोप- प्रत्यारोपावर बोलताना ते कधीही एकमेकांना डोळा मारतील अस देखील पाटील म्हणाले. 

आगामी केडीएमसी निवडणूक आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 'निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशन'तर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.शिवसेना - भाजपच्या विरोधावर आमचा विश्वास नाही.सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असणाऱ्या विरोधाच्या राजकारणावर आपला अजिबात विश्वास नाहीये. ते कधीही एकमेकांना डोळा मारतील त्यामूळे त्यांचे राजकारण त्यांनाच लखलाभ असो ,असे  आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी  पाटील यांनी विकासकामांसह दि.बा. पाटील नामकरण, केडीएमसी निवडणूक, शिवसेनेचे राजकारण, 27 गावे, पोलिसांची दडपशाही, सेना-भाजप विरोध, केडीएमसी आयुक्त आदी ठळक विषयांवर बेधडकपणे आपली मते व्यक्त केली. 

सत्तेसाठी मनसेने लाचारी आणि नैतिकता सोडली नाही.मनसेने सत्तेसाठी कधीही शिवसेनेसारखी लाचारी पत्करली नाही की नैतिकता सोडून आपले निर्णय बदलले नाहीत. सत्तेसाठी वेळ पडली असती तर त्यांनी एमआयएमशीही हातमिळवणी केली असती. आम्हाला राज साहेबांच्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार समजतात. त्यातून आपण एकच म्हणू शकतो की सत्तेसाठी त्यांनी एवढे खालची पायरी गाठायला नको होती असे सांगत शिवसेनेच्या महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापनेच्या निर्णयावर आमदार पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. आगामी निवडणुकीत सत्ताधा-यांनी जी आश्वासने दिली होती त्याबद्दल त्यांना जाब विचारणार. त्यांनी भावनिक मुद्दे दाखवले तर आम्ही रस्त्यावरचे खड्डे दाखवून जाब विचारणार आणि तेच सर्व मुद्दे लोकांपर्यंत घेऊन जाणार असल्याचे  पाटील म्हणाले. यावेळी झालेल्या वार्तालाप कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, हर्षद पाटील, सुदेश चुडनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

दिबांच्या नावाला केलेल्या विरोधाचे परिणाम लवकरच दिसणार

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावं ही आमची मनापासूनची इच्छा आहे. मात्र कोणाचीही मागणी नसताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पुढे करून विरोधी भूमिका घेतल्याने इथला आगरी समाज कमालीचा नाराज झाला आहे. आगरी समाजाचा हा राग त्या पक्षावर नसेल मात्र या व्यक्तीमुळे तो पक्षावर निघेल आणि येत्या काळात त्याचे परिणाम दिसतील असा सूचक इशाराही  पाटील यांनी यावेळी शिवसेनेला दिला. 

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका