कल्याण : शहरातील मोबाईलचे नेटवर्क मागील काही दिवसांपासून वारंवार गायब होत असून ‘कॉल ड्रॉप’ होत असल्याने मोबाईल ग्राहक त्रस्त झाले आहेत. डिजिटल इंडिया बनविण्यासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून व्यवहारातील रकमांच्या देवाणघेवाण करण्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो. मात्र, नेटवर्क गायब झाल्याने ग्राहकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील सर्वच मोबाईल ग्राहकांकडे विविध कंपन्यांचे सीम कार्ड आहेत. शहरात मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे मात्र, वारंवार नेटवर्क गायब होणे, नेटवर्क असतानाही कॉल न लागणे, फोन लागला तर आवाज ऐकू न येणे, बोलता-बोलता फोन मध्येच कट होणे अशा तक्रारींनी मागील काही दिवसांपासून ग्राहक त्रस्त झाले आहेत.
कस्टमर नंबरला अनेकवेळा कॉल केला, कॉल लागताच कंपन्यांकडून ऑफरची रीघ लागल्याचे रवी जाधव यांनी सांगत कंपन्या केवळ चांगली सेवा देण्याचे आश्वासन देतात मात्र सेवा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.