डोंबिवली- मध्य रेल्वेच्या कल्याण व डोंबिवली या गर्दीच्या रेल्वे स्थानकातून मोबाइल चोरीच्या घटनात वाढ झाली असून कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात जानेवारी ते मार्च तीन महिन्यात सुमारे ३५० तर डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात ४० मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून असे एकूण सुमारे ३९० मोबाइल चोरीच्या घटना घडल्या आहेत.
महागडे मोबाइल चोरल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे म्हणाले की, सर्वधिक चोरीच्या घटनेत मोबाइल चोरोचे प्रमाण जास्त आहे, त्यासह अन्य सुमारे ५० गुन्हे नोंदवले असून ३५ टक्के चोरीची उकल करण्यात यश आले असून अन्य गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. डोंबिवली जीआरपीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने म्हणाल्या की ४० पैकी १२ मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यासह अन्य ३१ गुन्हे घडले असून, त्यात पोक्सो, अपहरण, लाईन क्रॉस, अन्य गुन्हे, दुखापत,फसवणूक, खुनाचा प्रयत्न करणे आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.
त्या ३१ गुन्ह्यांपैकी १३ गुन्ह्यांची उकल।झाली असून अन्य तपास सुरू असल्याचे सांगण्यात।आले. कल्याण हे जंक्शनचे स्थानक असून तेथे लांबपल्याचा शेकडो ट्रेन थांबतात, तसेच लोकलही थांबतात, डोंबिवली हे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक।असून या।दोन्ही स्थानकात अहोरात्र प्रवाशांची वर्दळ असते, त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण देखील तुलनेने जास्त असते. प्रवाशांनी सतर्कता दाखवून प्रवास करावा, सहप्रवाशांना देखील सहकार्य।करावे जेणेकरून चोरीच्या घटनांवर आळा बसेल. मोबाइलवर।लोकल डब्याच्या दरवाजात बोलणे, प्रवासात झोप आल्यास मोबाइल व्यवस्थित न ठेवणे यासह अन्य छोट्या निष्काळजीच्या कारणांनी चोरीच्या घटना घडतात तेव्हा सतर्क राहून प्रवास करावा असे आवाहन पोलिसांनी।केले आहे.