कल्याण - महागाईचा सर्वात जास्त फटका महिलांना बसला आहे. अन्नधन्यासोबतच गॅस सिलेंडरचे भाव भरमसाठ वाढल्याने पुन्हा महिलांना धूर खाण्यास भाग पाडले असून, उज्जवला योजना ही महागाईमुळे मागे पडली आहे तर ४० टक्के महिलांनी चूल पेटवण्यास मजबूर केली असल्याची टीका महिला जिल्हाध्यक्ष कोधन कुलकर्णी यांनी टीका केली. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ जनजागरण अभियानाअंतर्गत महिला काँग्रेस कमिटीतर्फे कल्याणातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कुलकर्णी यांनी महागाईमुळे समजाला आणि सर्वात जास्त महिलांना भेडसावणाऱ्या समस्येबाबत आपले मत मांडत मोदी सरकार यांच्यावर टीका केल्या.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात जनजागरण आंदोलन सुरु आहे देशात वाढलेल्या पेट्रोल, डीजेल, खाद्य तेल, अन्नधान्य आणि गस सिलेंडर यांचे वाढलेल्या भावा संदर्भात महिला काँग्रेस तर्फे आज धरणे आंदोलन करण्यात आले. रविवारी कल्याणमध्ये देखील पदयात्रा होती. या पदयात्रेला जनतेने प्रतिसाद दिला -असून मोदी सरकारविषयी असलेला रोष दिसून आला. सर्वसामान्यांचा आवाज मोदी सरकार पर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत आंदोलन हे सुरू राहणार असल्याचे कांग्रेस कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले. विशेष म्हणजे यावेळी धरणे आंदोलनात महिला कार्यकत्यांचा मोठा सहभाग घेतला.