कल्याण - कल्याण डोंबिवली व नजीकच्या परिसरात वीजचोरीच्या अनेक घटना समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच एका मोबाईल कंपनीच्या टॉवरसाठी चोरून वीज घेतली जात असल्याचा प्रकार देखील उघड झाला होता. आता कल्याण नजीक असलेल्या मांडा-टिटवाळा परिसरात वीज चोरी करणाऱ्या ३१ वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण आठ लाख रुपयांची वीजचोरी महावितरणने उघड केली आहे. महावितरणच्या कल्याण ग्रामीण विभागात मांडा-टिटवाळा येथील 31 जणांविरुद्ध 8 लाख 4 हजार 480 रुपयांची 59 हजार 855 युनिट वीज चोरल्याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पथकांच्या तपासणी मोहिमेत 8 ऑक्टोबरला ही वीजचोरी उघडकीस आली होती.दिनेश धर्मा घायवत, शितल विश्वनाथ गांगुर्डे, मोहम्मद याकूब वायलाल, भारती ज्ञानू वरपे, तरुना गौतम प्रधान, विजयदत्त किसन गवळे, नरेश नंदकुमार अमुकर, पदमावती दशरथ पगारे, बळीराम वामन चौधरी, खातुन शहाजान खान, परशुराम यशवंत कुचीकुरे, लक्ष्मण हरी पारधी, आयशा खातून मोहम्मद, के के भोईर, संदिप संभाजी मालेकर, छोटेलाल पी गुप्ता, गणेश अनिल काशिवले, विकास अनिल काशिवले, कोंडु भिल्या काशिवले, स्वप्निल नटूराम मेंढे, विष्णु मोहन धिंडके, प्रकाश जाधव, शितल शांताराम दळवी, निशिगंधा निलेश ताम्हणकर, महिपालभाई पी गांधी, रोहिणी सचिन पगारे, सुमित्रा लक्ष्मीराम, अन्सारी झरीना, बाळु गोविंद गायकर, एम .एस. ओमकार, मयुर विनोद तिवारी (सर्व राहणार मांडा व टिटवाळा परिसर) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
संबंधितांकडून मीटरमध्ये फेरफार, मीटर बायपास आणि वीजपुरवठा खंडित केलेल्या ठिकाणी परस्पर केबल जोडून वीजचोरी होत असल्याचे विशेष पथकाच्या तपासणीत आढळून आले होते. सहायक अभियंता निलेश महाजन यांच्या फिर्यादीवरून मुरबाड पोलीस ठाण्यात संबंधित 31 जणांविरुद्ध वीज कायदा 2003 च्या कलम 135 नुसार वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.