- अनिकेत घमंडीडोंबिवली - १५ ऑगस्ट पासून प्रवास देण्यासाठी राज्य शासनाने सुरू।केलेल्या महापालिका अंतर्गत मदत केंद्रांवर कर्मचारी, अधिकारी यांना कोविड सर्टिफिकेटचे बारकोड स्कँन करता येत नसल्याने मोठी पंचाईत झाली असल्याचे निदर्शनास आले. बुधवारी डोंबिवली पूर्वेला नागरिकांनी गर्दी केली पण कर्मचारी कुशल नसल्याने सगळा गोंधळ उडाला होता. पोलीस यंत्रणा नागरिकांना।शांत रहा सांगत होती, तर मनपा कर्मचारी कामात व्यस्त होते. बारकोड स्कॅन कसा करायचा यामुळे ते हैराण झाले होते. ( Municipal employees could not scan barcodes at railway pass help center)
डोंबिवली पूर्वेला ५, पश्चिमेला ६, ठाकुर्लीत ५ असे केंद्र आहेत. कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवास सुविधा मिळावी यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली बुधवारपासून सर्टिफिकेट तपासणी मोहीम।सुरू।करण्यात येत आहे. त्यासाठी डोंबिवली, ठाकुर्लीत एकूण १५ मदत केंद्र महापालिका उघडणार आहे. त्यासाठी।मनपाचे प्रभागक्षेत्र अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून भूमिका बजावतील. पश्चिमेला ६, पूर्वेकडे ५ आणि ठाकुर्लीत ४ मदत केंद्र राहणार आहेत.
सकाळी ७ वाजल्यापासून ते केंद्र सुरू होण्याची शक्यता होती, तसे झाले पण कर्मचारी कुशल नसल्याने त्याचा परिणाम सेवेवर झाला. तिकीट वितरण केंद्राचे हॉल, पादचारी पूल असे त्याचे लोकेशन असेल, त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांचे सर्टिफिकेट तपासून त्याना पास काढण्यासाठी शिक्का मारून अनुमती देण्यात येणार असल्याची माहिती फ प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पाटील यांनी दिली. त्यानंतर संबंधित नागरिक प्रवासासाठी पास, तिकिट काढायला जाऊ शकतात. त्याशिवाय त्याना अनुमती नसेल असेही स्पष्ट करण्यात आले.