उल्हासनगर : हवेतील प्रदूषण टाळण्यासाठी शहरातील ढाबे, हॉटेल, रेस्टॉरंट व बेकरी मध्ये कोळसा, लाकडे यांच्यावर महापालिकेने बंदी घातल्याने, नागरिकांना ढाबे व हॉटेल मधील चुलीवर बनविण्यात येणारे चविष्ट मटण, भाकरीला मुकावे लागणार आहे. कोळसा व लाकडा ऐवजी इलेक्ट्रिकल मशीनचा वापर करण्यास व्यावसायिकांना महापालिकेने सुचविले आहे.
उल्हासनगरातील हॉटेल, ढाबे, रेस्टोरंट व बेकरी मध्ये लाकडे व कोळशाचा वापर होत असल्याने, हवेच्या प्रदूषणात वाढ होतो. हवेतील प्रदूषण टाळण्यासाठी महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी शहरातील ढाबे, हॉटेल, रेस्टोरंट व बेकरी चालक मालकांची बैठक महापालिका सभागृहात गुरवारी बोलाविली होती. बैठकीला अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त सुभाष जाधव, पर्यावरण विभाग प्रमुख सौ. विशाखा सावंत आदीजन उपस्थित होते. यावेळी उपायुक्त सुभाष जाधव यांनी ५५ पेक्षा जास्त हॉटेल, बेकरी, रेस्टोरंट व ढाबे मालक व चालका सोबत संवाद घालून, हवेतील प्रदूषण टाळण्यासाठी लाकडे व कोळसा वापरू नये. याबाबत त्यांना साद घातली आहे.
कोळसा व लाकडे जाळल्याने नील हवेचे प्रदूषण होते. हे प्रदूषण टाळण्यासाठी एलपीजी किवा इलेक्ट्रीक मशीन, ओव्हनचा वापर करावा. याबाबत महापालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. महापालिका हद्दीतील हॉटेल, ढाबे, रेस्टोरंट व बेकरी व्यवसायिकांची आढावा बैठक घेऊन कोळसा व लाकडे वापरण्याला बंदी घालण्यात आले आहे. सदर जनजागृती कार्यक्रमासाठी महापालिकेच्या जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, सहायक आयुक्त अधिकारी गणेश।शिंपी, अनिल खतुरानी व पर्यावरण विभागाचे भानु परमार व इतर कर्मचारी उपस्थित होते.