शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

खूप काळ टिकण्यासाठी वाचन आवश्यकच : संकर्षण कऱ्हाडे 

By अनिकेत घमंडी | Published: October 14, 2023 4:26 PM

अखंड वाचन यज्ञाचे बिगुल वाजले 

कल्याण : "वाचन आपल्या आयुष्यात फार महत्वाचे आहे , ते चटकन व्हायरल होणाऱ्या आणि पटकन विस्मरणात जाणाऱ्या गोष्टींसारखे नाही. वाचन कायम आपल्या मनात आणि डोक्यात रहाते आणि शेवटपर्यंत आपली सोबत करते " असे प्रतिपादन प्रख्यात अभिनेते आणि कवी संकर्षण कऱ्हाडे यांनी अखंड वाचनयज्ञच्या उद्घाटन प्रसंगी केले. 

अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वतीने आणि बालक मंदिर संस्था कल्याण व सार्वजनिक वाचनालय कल्याण यांचे सहकार्यातून आयोजित करण्यात आलेल्या सलग ३६ तास आणि एकत्रित १०० तास  अखंड वाचनयज्ञ कार्यक्रमाचे उद्घाटन  प्रसंगी त्यांनी आपल्या खुसखुशीत शैलीत अनेक उदाहरणे आणि किस्से सांगत मुलांना हसवत वाचनाचे महत्व समजावून दिले. प्रत्येक क्षेत्रात मोठी झालेली माणसे वाचनामुळे कशी घडली हे सांगून त्यांनी आपल्या अनोख्या अंदाजात कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

"वाचनाशी नाळ जुळणे महत्वाचे असते , एकदा का नाळ जुळली की ती  आपल्याला यश देते. वाचन हे एका दिवसापुरते न राहता ते सातत्याने केले पाहिजे " असे प्रतिपादन कोमसाप केंद्रीय अध्यक्ष डॉ प्रदीप ढवळ यांनी केले.  यशोदा या साने गुरुजी यांच्या आईच्या जीवनावरील मालिकेतील बालकलाकार वरदा देवधर हिने आपल्या छोटेखानी भाषणात सांगितले की , " वाचनामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि त्यामुळे मी अभ्यास व अभिनय या दोन्ही गोष्टींची सांगड घालू शकले." 

या प्रसंगी डॉ योगेश जोशी यांनी संपादित केलेल्या वाचनरंग या वाचन विषयक मान्यवरांच्या मुलाखती व लेख असलेले पुस्तक मान्यवरांचे प्रकाशित करण्यात आले. या प्रसंगी सार्वजनिक वाचनालय कल्याण चे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी , बालक मंदिर संस्था कार्याध्यक्ष मयुरेश गद्रे यांची समयोचीत भाषणे झाली.

बालक मंदिर येथे आचार्य प्रल्हाद केशव नगरीमध्ये ना. धो. महानोर आणि साने गुरुजी वाचन कट्टा येथे आयोजित या उपक्रमात उद्घाटन झाल्यानंतर १५ शाळांतील १२५० विद्यार्थ्यांनी व्यासपीठावरून अभिवाचन केले तर ६५०० हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी याचा आस्वाद घेतला. रविवार १५ ऑक्टोबर रात्री ८ वाजेपर्यंत हे वाचन सुरू राहणार असून त्यामध्ये १२०० हून अधिक वाचक आणि १५००० हून अधिक रसिक सहभागी होतील असा विश्वास अक्षरमंचचे सचिव हेमंत नेहते यांनी व्यक्त केला. सदर उपक्रमास भिकू बारस्कर , तेजस्विनी पाठक , भालचंद्र घाटे, उत्तम गायकवाड , आरती मुळे , आरती कुलकर्णी , डॉ सुनील खर्डीकर,  गीता जोशी , मच्छिंद्र कांबळे , शैलेश रेगे,  गजेंद्र दीक्षित , पुंडलिक पै, अरविंद शिंदे यांचे सहकार्य लाभले आहे. 

टॅग्स :kalyanकल्याण