उल्हासनगर : शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळा तसेच महाविद्यालयाचे नामफलक इंग्रजी भाषेत आहेत. एका आठवड्यात नामफलक मराठीत झाले नाहींतर, आंदोलनाचा इशारा मनसेचे कल्पेश माने यांनी दिला आहे.
उल्हासनगरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळा, महाविद्यालयासह इतर संस्थेचे नामफलक इंग्रजी भाषेत आहेत. हा मराठी भाषेचा अपमान असून शाळा, महाविद्यालयासह इतरांनी आपआपले नामफलक मराठी लिहण्याचें आव्हान मनसेचे कल्पेश माने यांनी केले. शासनाचा याबाबत आदेश असूनही शाळा, महाविद्यालय व इतर संस्था शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवित आहेत.
याबाबत मनसेने महापालिकेसह संबंधितांना पत्र दिले आहे. एका आठवड्यात नामफलक मराठी भाषेत झाले नाहीतर, आंदोलन करण्याचा इशाराही माने यांनी दिला आहे. यापूर्वीही मनसेने नामफलकावरून आंदोलन केले होते. असे असतानाही मराठी ऐवजी इंग्रजीचे नामफलक लावले जात असल्याने, नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.