डोंबिवली : माजी खासदार शरद पवार तुम्ही तर आमचे राजकीय गुरू तुम्ही घेतला संन्यास मग आम्ही काय करू असे म्हणत पक्षाचे कल्याण जिल्हाकार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील, युवक ठाणे जिल्ह्याध्यक्ष सुधीर पाटील यांच्यासह राज जोशी आदींनी त्यांचे राजीनामे गुरुवारी पक्षाकडे दिले. पाटील कुटुंबियांच्या वतीने सुमित सोनके यांनी ही माहिती समाज माध्यमांद्वारे दिली.
वंडार पाटील यांनी राजीनामा पत्रात म्हंटले की, त्यांनी त्यांचे राजकीय कारकीर्द शरद पवार यांच्यासोबत चालू केले आणि त्यांनाच ते राजकारणातील गुरू मानतात. मधल्या काळात मला माझ्या कुटुंबीयांना पक्षांतराबाबत खूप त्रास दिला गेला. ( माझ्या मुलाची हत्या केली. ) तरी सुद्धा मी आपल्या सोबत आपल्याच पक्षाचेच काम केले असेही पाटील म्हणाले.
त्यामुळे आता जर पवार यांनी पक्ष अध्यक्षचा राजीनामा दिला तर आमचा जाणता राजा आम्ही कोणाला बोलणार. पवार यांनी घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा आम्ही कल्याण डोंबिवली जिल्हा कार्याध्यक्ष, ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष, कल्याण डोंबिवली युवक अध्यक्ष राजीनामे देत आहोत ते तात्काळ मंजूर करावेत. खूप कार्यकर्ते व्यथित असून रडत आहेत. किती जणांना आम्ही शांत करावे त्यामुळे तुम्ही राजीनामा मागे घ्यावा अन्यथा आमचे राजीनामे।मंजूर करावेत असे म्हणत त्यांनी राजीनामा पत्र दिल्याचे सांगण्यात आले.