डोंबिवली - पेट्रोल डिझेल इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक कल्याण जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी सोमवारी कल्याण शीळ महामार्गावरील टाटा पॉवर लेन भागात काही वेळ रस्ता रोको करून निषेध आंदोलन केले. वर्षानुवर्षे इंधन दरवाढ सुरूच असून आता यंदाही जीडीपी खाली घसरत आहे, ते योग्य नसून काहीही झाले तरीही ही दरवाढ कमी व्हाययलाच हवी या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे. यासंदर्भात गतवर्षीही आंदोलन केल्याचे ते म्हणाले. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलन संदर्भातही त्यांनी नाराजी व्यक्त केली, ते म्हनाले की जो अन्नदाता आहे त्यांना सरकार आतंकवादी अशी उपमा देतात हे योग्य नाही, त्यांच्या मागण्यांचा विचार केला पाहिजे. कोणत्याही घटकांचा विचार न करता सरकार थेट निर्णय घेत आहे हे योग्य नसल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादी कोंग्रेसचे रमेश बोरगावकर, सारिका गायकवाड, प्रशांत नगरकर, उज्जवला भोसले, योगेश माळी, समीर भोईर, भाऊ पाटील आदि उपस्थित होते.
त्यानंतर तलाठी कार्यालयापर्यन्त पदयात्रा काढून दुचाकी ढकलून नेण्यात आल्या, तिथे मोदी सरकार हाय हाय, इंधन दरवाढ कमी झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या.