कल्याण: दिल्ली ते जेएनपीटी हायवेचे काम सध्या सुरु आहे. हा हायवे बांधून तयार झाल्यावर दिल्ली ते मुंबई हे अंतर अवघ्या 12 तासात पार करता येणार. याशिवाय या हायवेमार्गे अवजड वाहने शहराच्या बाहेरुन मार्गस्थ होतील. त्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल असा विश्वास केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केला.
कल्याणच्या सुभेदार वाडा कट्टय़ाच्या वतीने स्वर्गीय नेते राम कापसे व्याख्यानमाले निमित्त ऑनलाईन श्रोत्यांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी उपरोक्त माहिती दिली आहे. मंत्री गडकरी यांनी सांगितले की, देशाला पुढे नेण्यासाठी उद्योग आणि शेती अधिक विकसीत करावी लागेल. त्यासाठी पाणी, इंधन, वाहतूकीची साधणो आणि कम्यूनिकेशन यात नवनवे प्रयोग करावे लागतील. रस्ते आणि रेल्वे वाहतूकीपेक्षा जलवाहतूकीचा खर्च कमी आहे. त्यामुळे 1क्2 जलमार्ग विकसीत करण्याचे काम सुरु आहे. ग्रीन इंधन तयार करण्यावर भर दिला जात आहे.
इथेनॉल इंधन हे डिङोलपेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे दोन लाख कोटीची इकॉनॉमी वाढणार आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होईल. तसेच शेतकऱ्यांचा फायदा होईल. एलएनजी, सीएनजी इंधनावर चालणारी वाहने तयार करण्यासाठी विविध कंपन्या पुढे येत आहेत. बायो एलएनजी, सीएनजी तयार करण्याच्या योजनेवर मोठय़ा प्रमाणात काम सुरु आहे. त्याबरोबर विंड, हायड्रो पॉवरला चालना दिली जात आहे. ग्रीन हायड्रोजेन वापर करण्यासाठी कच:यातून निर्माण होणा:या मिथेन वायूपासून ग्रीन हायड्रोजनचा वापर करता येऊ शकतो. ई वाहनाचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. ई वाहनामुळे प्रति किलोमीट प्रवास खर्च कमी होईल. ई हायवे आणि ग्रीन हायवे तयार केली जातील. देशात 22 ठिकाणी ग्रीन हायवे असतील. त्यामुळे प्रदूषण कमी होऊन वेळीच बचत होईल. तसेच लॉजीस्टीकवर होणारा खर्चाची बचत होण्यास मदत होईल. तंत्रज्ञानाचा वापर करुन देशाच्या सर्वागीण विकासासाठी काम केले पाहिजे. ते राहून गेले
नागपूरच्या धर्तीवर रोड, त्याच्यावर ब्रीज, त्यावर मेट्रो असे बांधले असले तर रोड झाले असते. वेस्टर्न बायपास इस्टर्न बायपासची कॅपॅसिटी डबल झाली असती. देवेंद्र म्हणले की, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण ते राहून गेले ही बाब गडकरी यांनी नमूद केली .