कल्याण-टिटवाळा नजीक गुरुवली येथील जमीन व्यवहार प्रकरणी ईडीची टीम चौकशीकरीता कल्याण पश्चिमेतील एका बिल्डरच्या घरी पोहचली. यावेळी टीमच्या अधिकाऱ्यांयासोबत बिल्डरच्या पत्नीचा वाद झाला. बिल्डरला कोरोना झाल्याने बिल्डरला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बिल्डरच्या पत्नीचे म्हणणे आहे की, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासोबत जमीनीचा व्यवहार झालेला नाही. आम्हाला नाहक त्रास देऊन घाणेरडे राजकारण केले जात आहे.
शिवसेना आमदार सरनाईक यांनी गुरुवली येथे ७८ एकर जमीन खरेदी प्रकरणी ईडीने कारवाई केली होती. ही जागा ईडीने जप्त केली असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली होती. आज सकाळी ७.४५ वाजता ईडीचे अधिका:यांचे चौकशी पथक कल्याण पश्चिमेतील गोररेज हिल परिसरातील योगेश देशमुख यांच्या विराजमान बंगल्यावर पोहचले. या पथकात दहा अधिकारी होते. त्यापैकी एक महिला अधिकारी होती. सुरुवातीला योगेश यांच्या पत्नी शीतल यांचा चौकशी पथकासोबत वाद झाला. याच दरम्यान बिल्डर योगेश देशमुख यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान योगेश देशमुख यांच्या पत्नी शीतल यांनी सागंतिले की, माझे पती योगेश यांना कोरोना झाला आहे. त्यामुळे आमच्या बंगल्याचा परिसर सील करण्यात आला आहे. पतीला कोरोना झाला आहे हे सांगून देखील कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत ईडीचे अधिकारी घरात पोहचले. चौकशीकरीता जबाब देण्याकरीता घेऊन जाण्यासाठी आले होते. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे टिटवाळा परिसरात जमीनी घेत होते. त्यांच्यासोबत आमचा जमीनाचा व्यवहार झालेला नाही. आर्थिक कारणामुळे हा व्यवहार रद्द झाला होता. यासंदर्भात आमची केस सुरु आहे. मात्र प्रताप सररनाईक यांनी ही जागा घेतली आहे. त्यांनी जमीनीसाठीचा पैसा मनी लॉड्रींगमधून उभा केला आहे असे सांगा असे ईडीचे पथक सांगत होते. त्यांना सरनाईक याच्या विरोधात केस उभी करायची असेल. हे घाणेरडे राजकारण सुरु आहे. या सगळ्य़ा राजकारणात आम्ही, शेतकरी आणि मध्यस्थ भरडले जात आहोत. त्याचा त्रस आम्हाला होत आहे. शीतल देशमुख यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर केलेले आरोप गंबीर स्वरुपाचे आहेत. या प्रकरणाती नेमके काय सत्य आहे हे तपासाअंती समोर येईल.