डोंबिवली: तीन महिन्यापासून पक्के लायसन कल्याण आरटीओ कडून मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आरटीओ अधिकारी क्लार्क नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देत असून ते योग्य नाही, नागरिकांशी सौजन्याने वागा, अन्यथा नागरिकांसमवेत आंदोलन केले जाईल असा इशारा देत भाजपच्या वाहतूक सेलचे कल्याण जिल्हाद्यक्ष दत्ता माळेकर यांनी सोमवारी आरटीओ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली.
त्यांनी पत्रात म्हंटले आहे की, आरटीओ कार्यालयात नियमाप्रमाणे कार्यभार सुरू नाही. त्या कार्यालयामध्ये आरटीओ परिसरातील नागरिकांनी लायसन साठी एप्लीकेशन देऊन लर्निंग व त्यानंतर डीएल साठी ट्रायल देऊन तीन महिने झाले तरी नागरिकांना लायसन मिळाले नाही असे निदर्शनास आले।आहे. त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता दहा दिवसात लायसन्स पोस्टाने घरी येणे अपेक्षित होते, मात्र तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले.
आताच महाराष्ट्र शासनाने शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून जनतेची कामे व्हावीत त्यांना न्याय मिळावा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी सुरुवात केली, पण कल्याण आरटीओ मध्ये बसलेले अधिकारी व कर्मचारी निगरगठ्ठ, गेंड्याच्या कातडीचे असल्यामुळे त्यांना काही फरक पडत नसल्याची टीका माळेकर यांनी केली. महाराष्ट्रातील एकमेव कल्याण आरटीओ असे कार्यालय आहे की इथे सदैव इंटरनेटचा प्रॉब्लेम असतो, बाकी इतर ठिकाणी हे प्रॉब्लेम नाहीयेत का? असा सवाल त्यांनी केला.
तिथे असलेले क्लार्क मनमानी करत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी कल्याण आरटीओ परिसरातील नागरिक विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, लायसन्स येईल त्यावेळेला घ्या नाहीतर काय करायचे ते करा, इंटरनेटच्या प्रॉब्लेम आहे,हे कारण पुढे करून नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचे माळेकर म्हणाले. कल्याण आरटीओ परिक्षेत्रातील लायसनधारक व नागरिक आरटीओच्या मनमानीला कंटाळले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि लायसन देण्याची ववस्था करावी।अशी मागणी त्यांनी केली, तसेच सुविधा न।मिळाल्यास आरटीओ विरोधात आंदोलन करणयात येईल असेही ते म्हणाले.
इंटरनेट समस्या आहेच, त्याबवत वरिष्ठ पातळीवर कळवले आहे, त्यामुळे लायसन वितरण वाबत अडथळे येत आहेत, तरी मॅन्युअल यंत्रणेद्वारे काम सुरू असून आता ६ जून पर्यंतचे काम करण्यात आले आहे. लायसन मिळण्यास लेट होत आहे हे बरोबर आहे : विनोद साळवी,एआरटीओ.