मुरलीधर भवार, कल्याण- नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारत प्रकल्पाच्या ठिकाणी पावसाचे पाणी साठून त्यात डास आळ्या तयार होता. त्यातून संसर्गजन्य आजारांचा फैलाव होतो. तो रोखण्याकरीता कल्याण डोंबिवली महापालिकेने कृती आराखडा तयार केला आहे. महापालिकेच्या पथकाने नव्याने बांधकाम केले जात असलेल्या गृह निर्माण प्रकल्पाची पाहणी केली असता साठवलेल्या पावसाच्या पाण्यात डास आळ्या आढळून आल्याने १२ बिल्डरांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. महापालिकेचे मुख्य स्वच्छता निरिक्षक वसंत देगूलकर यांनी ही कारवाई आयुक्त इंदूराणी जाखड यांच्या आदेशानुसार केली आहे.
ज्या बिल्डरांना नोटिस बजावली आहे. त्यामध्ये बी. आर. होमर्स, योगीराज शेळके, आेंमकार, चिन्मय पाटील, राजेंद्र परांजपे, श्री रवि शुंभकर सोसायटी, श्रीकृष्ण मराठे, सौरभ उजावडे, संदीप गुंडे, अभय कामत, सचिन कटके आणि नीलपदम डेव्हलपर्स याांचा समवेश आहे. यासह महापालिका हद्दीतील नव्याने बांधकाम केले जात असलेल्या सर्व बिल्डराना बजावले आहे की, पावसाचे पाणी साठणार नाही. तसेच दूषित पाणी साचणार नाही. त्यात डास आळ्या तयार होणार नाही याची काळजी घ्यावी.