कल्याण - कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. तरी देखील वाढत्या रुग्ण संख्येच्या तुलनेत बेडची संख्या कमी पडत आहे. त्याचा एक विदारक प्रत्यय आज महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात आला. रुग्णांना रुग्णालयाच्या पॅसेजमध्ये असलेल्या बाकांवरच झोपवून ऑक्सीन दिला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
महापालिका हद्दीत एक हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहे. महापालिकेने आरोग्य यंत्रणा उभारली आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. महापालिकेची सहा कोविड रुग्णालये आणि कोविड केअर सेंटर आहे. त्याशिवाय 68 खाजगी कोविड रुग्णालये सुरु आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता महापालिका आणि खाजगी कोविड रुग्णलायात एकही बेड उपलब्ध होत नाही. त्यात महापालिकेने टेस्टींगचे प्रमाण वाढविल्याने रुग्ण पॉझीव्हीटी रेट जास्त आहे. महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात दोन दिवसापूर्वीच संशयीत रुग्णांकरीता माणूसकीचा वार्ड सुरु करण्यात आला. हा वार्डही फूल झाला आहे. आज संशयीत रुग्ण आहे. ज्यांना ऑक्सीजनची गरज आहे. ज्यांची स्थिती गंबीर आहे. त्यांना रुग्णालयाच्या पॅसेजमधील बाकावरच ऑक्सिजन लावल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळाले. रुग्णांना बेड मिळत नसल्याने रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी धावपळ करणारे रुग्णाचे नातेवाईक हवालदिल झाले आहे.
यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता महापालिका बेडची क्षमता वाढविण्यासाठी दिवसरात्र प्रयत्नशील आहे. रुक्मीणीबाई रुग्णालयात रुग्णांना ऑक्सीजन बाकावर झोपवून दिला जात आहे, ही वस्तूस्थिती आहे. मात्र, रुग्णांचा जीव वाचविणे हा महत्वाचा उद्देश त्यात आहे. त्यांची गैरसोय होत आहे. मात्र त्यावर लवकरच मात केली जाईल.
आज सायंकाळी अत्यंत तातडीची बैठक आयुक्तांनी घेतली. त्यात महापालिकेचे अधिकारी, आरोग्य विषय तज्ज्ञ उपस्थित होते. उद्या देखील आयुक्त वेबीनॉर द्वारे खाजगी कोविड रुग्णालयांशी संवाद साधणार आहे. त्यात इंजेक्शनचा वापर, बेडची उपलब्धता, ऑक्सीजनचा पुरवठा या संदर्भात आढावा घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.