शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

तुमची एक चूक पडू शकते महाग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 1:45 AM

पोलिसांची जनजागृती  गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांतून फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क डाेंबिवली :  वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन डोंबिवली पोलिसांतर्फे केले जात आहे. पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि सहायक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या रेझिंग डे कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘प्रलोभनांना बळी पडू नका, आपली एक चूक, पडू शकते महाग,’ अशा सावधानता बाळगण्याच्या सूचना करताना घरोघरी पत्रके वाटून, शहरातील चौकांमध्ये होर्डिंग्जद्वारे जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.

गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांतून फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. मोबाइल, इंटरनेटचा आधार घेऊन भामट्यांकडून सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे उच्च शिक्षितांनाही लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्षभरात असे ३० गुन्हे घडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सांडभोर यांनी नागरिकांनी जागरूक राहावे, असे आवाहन केले आहे.

सायबर गुन्ह्यांबाबतची जनजागृती अधिक व्यापक होण्यासाठी शहरातील ५० ठिकाणी होर्डिंग्ज लावण्यात येणार आहेत. ध्वनिक्षेपकाद्वारे सतर्कतेच्या सूचनाही नागरिकांना केल्या जाणार आहेत. खातेदारांची होत असलेली फसवणूक पाहता बँकांनीही अधिकाधिक जागरूकता करणे गरजेचे असल्याकडेही सांडभोर यांनी लक्ष वेधले.

अशी घ्या खबरदारीअनोळखी व्यक्तीने कोणतेही प्रलोभन दाखविले तरी डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती देऊ नका. फेसबुक, इन्स्टाग्रामवर मित्र-मैत्रिणींकडून येणाऱ्या संवेदनशील संदेशाची खात्री करा, अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, लॉटरी लागली आहे, नोकरी, मोबाइल कंपनीचे टॉवर लावण्यासाठी अशी प्रलोभने देऊन रजिस्ट्रेशन करण्यास सांगून प्रलोभन दाखविणाऱ्यांना बळी पडू नका, अशा सूचना सांडभोर यांनी केल्या.