डोंबिवली : महापालिका क्षेत्रात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता शेअर पद्धतीने रिक्षात दोनच प्रवासी घेण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले. काही दिवसांपासून पूर्वीप्रमाणे तीन ते चार प्रवासी घ्यायला रिक्षाचालकांनी सुरुवात केली होती. आता पुन्हा कोविड नियम पाळण्यास सांगितल्याने रिक्षाचालकांची पंचाईत झाली असून प्रवाशांना कोण समजावणार, असा सवाल आहे.यासंदर्भात रिक्षा युनियन पदाधिकारी आणि पोलीस यांच्यात शुक्रवारी सायंकाळी वाहतूक पोलीस कार्यालयात बैठक झाली. दोन प्रवासी घेऊ, पण भाड्याबाबत प्रवाशांना सांगण्यात यावे, त्यावरून वाद होतात, असे भाजपच्या कल्याण जिल्हा वाहतूक सेलचे अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी युनियनच्या वतीने सांगितले. त्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे यांनी पश्चिमेला उद्घोषणा यंत्राद्वारे घोषणा देण्यात येत असून तशी जागृती करणार असल्याचे म्हटले.
चालकांवर कारवाई रिक्षाचालक मास्क घालत नाहीत, सॅनिटायझर ठेवत नाहीत, अशा तक्रारी आहेत. नियम तोडणाऱ्या चालकांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे यांनी सांगितले.