शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

उल्हासनगर महापालिकेत ३२५६ पैकी १३०५ पदे रिक्त, कंत्राटी कामगारांचा भरणा

By सदानंद नाईक | Updated: February 12, 2024 13:31 IST

महापालिकेतील वर्ग-१ च्या ३६ पैकी २३ तर वर्ग-२ च्या २१ पैकी १३ पदे रिक्त असल्याने, एका अधिकाऱ्याकडे अनेक पदाचा पदभार देण्यात आला आहे

सदानंद नाईकउल्हासनगर : महापालिकेतील मंजूर ३२५६ पैकी १३०५ पदे रिक्त असल्याने, महापालिका कारभार कंत्राटी कामगारांच्या हाती जाण्याची भीती व्यक्त होत आहे. वर्ग-१ च्या ३६ पैकी २३, वर्ग-२ च्या २१ पैकी १३ तर वर्ग-क च्या ७३५ पैकी ४६० पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. 

उल्हासनगर महापालिकेत एकून ३२५६ पदे मंजूर असून त्यापैकी १३०५ पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. तर यावर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने, भविष्यात महापालिका कारभार कंत्राटी कामगारांच्या हाती जाण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. महापालिकेत सरळसेवा भरती वर्षानुवर्षे न झाल्याने, रिक्त पदाची टक्केवारी ४० पेक्षा जास्त झाली. गेल्या महिन्यात अभियंता, अग्निशमन दल सुरक्षारक्षक आदी १५८ पदे भरण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली. त्या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. तर महापालिका कारभार चालविण्यासाठी नाईलाजास्तव सेवानिवृत्त अधिकारी, कंत्राटी कामगारांची भरती खाजगी ठेकेदारा मार्फत सुरू आहे. कर्मचारी कमी असल्याने, महापालिका प्रभाग समिती क्रं-३ मधील अंतर्गत साफसफाईचे खाजगीकरण करून वर्षाला १२ कोटी रुपये खर्च केले जात आहे.

महापालिकेतील वर्ग-१ च्या ३६ पैकी २३ तर वर्ग-२ च्या २१ पैकी १३ पदे रिक्त असल्याने, एका अधिकाऱ्याकडे अनेक पदाचा पदभार देण्यात आला आहे. एकाच अधिकाऱ्याकडे एका पेक्षा जास्त पदाचा पदभार दिला असल्याने, ते त्या विभागाला न्याय देऊ शकतात का? असा आरोपही होत आहे. महापालिका कामगार संघटनेने कर्मचारी भरतीचा तगादा आयुक्ताकडे लावला आहे. मात्र भरती प्रक्रियेला शासनाची मंजुरी मिळत नसल्याने, ४० टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त असल्याची माहिती सहायक आयुक्त मनीष हिवरे यांनी दिली. वर्ग-क व वर्ग-ड ची प्रत्येकी ५०० पेक्षा जास्त पदे रिक्त असून शासनाने रिक्त पदासाठी सरळसेवा भरतीला मान्यता देण्याची मागणी विविध नेत्यांकडून होत आहे.

महापालिकेचा कारभार कंत्राटी कामगारांकडे? महापालिकेत रिक्त पदाची टक्केवारी ४० टक्के पेक्षा जास्त असून चालू वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारीची संख्याही मोठी आहे. त्यामुळे महापालिका कारभार कंत्राटी कामगारांच्या हाती जाते की काय? असा प्रश्नही निर्माण झाला.

शासनाकडे अधिकाऱ्यांची मागणीमहापालिका आयुक्त अजीज शेख यांनी शासनाकडे प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची मागणी केली. मात्र शासनाकडून अध्यापही अधिकारी मिळाले नाही.

 

टॅग्स :Ulhas Pawarउल्हास पवारLabourकामगारUnemploymentबेरोजगारी