डोंबिवली: शिवसेना।शिंदे गटाच्या शहरप्रमुख राजेश मोरे यांनी गुरुवारी काम।पूर्ण झाले नसताना ठाकुर्ली येथील स्वयंचलित जिन्याचा लोकार्पण सोहळा।केला, मात्र काही तासातच ती यंत्रणा बंद पडली, त्यामुळे शिंदे गटाच्या अतिउत्साही कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी घाई करू नये, त्यांना आवरा अशा सूचना।खासदार श्रीकांत शिंदे यांनी द्याव्यात असे आवाहन करणारी मागणी मनसेचे शहरप्रमुख मनोज घरत यांनी (कोणत्याही पदाधिकाऱ्याचे नाव न घेता) केली.
ठाकुर्लीतील स्वयंचलित जिन्यांचे काम पूर्ण झालेले नाही, डोंबिवलीत देखील ही समस्या आहेच, दिव्यातही स्वयंचलित जिने चालू बंद होत आहेत, याकडे रेल्वेने लक्ष घालावे आणि समस्या दूर करावी असेही घरत म्हणाले. खासदार शिंदे हे निधी आणतात, प्रकल्प होत आहेत हे मान्य आहे, परंतू त्यासाठी आमदार राजू पाटील यांनीही प्रयत्न।केलेले असतात, त्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्याआधीच उदघाटनाची घाई करू नका असेही घरत म्हणाले. निधी दिला जातो, पण त्याचा विनियोग याकडेही लक्ष द्यावे असेही घरत म्हणाले. एस्कलेटर हे प्रवाशांना गरजेचे आहे ते सुस्थित सुरू व्हायला हवेत अशी मागणी त्यांनी केली.
घरत यांनी मनसैनिकाना घेऊन बंद स्वयंचलित जिन्याची पाहणी केली, त्यावेळी त्यांनी तेथील जिन्याचा कर्मचाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की, काम पुर्ण झालेले नाही ग्रीस लावणे, ऑइल लावणे काम सुरू आहे, त्यानंतर ते सुरू करायचे की नाही हे वरिष्ठ अधिकारी ठरवतील. मात्र तो पर्यन्त ती सुविधा बंद राहणार असल्याचे स्पष्ट झाले.